DNA Live24 2015

कृती समितीचा जिल्हाधिकारी कार्यालया समोर घंटानाद

अहमदनगर :
मार्केटयार्ड चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील 14 वर्षापासून असलेले हॉटेलचे अनधिकृत अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अध्यक्ष अनिल ओहोळ, उपाध्यक्ष मोहन ठोंबे, पंकज लोखंडे, युवराज पाखरे, शरद सरोदे, संजय कांबळे, बन्सीभाऊ घोडेराव, अण्णासाहेब गायकवाड आदी सहभागी झाले होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील सुखसागर हॉटेल हे अतिक्रमण असून, सदर जागा महापालिकेच्या मालकिची आहे. महापालिकेने सदर हॉटेल चालकास नोटीस बजावून चोवीस तासाच्या आत मालकीहक्काबाबत सर्व कागदपत्रांच्या पुराव्यासह हजर राहण्याचा आदेश दिला होता. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. मात्र अद्यापि या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलेली नाही. या परिसरातील इमारतीत अनाधिकृतपणे निवासी वापर चालू आहे. तर इमारतीसमोर पत्र्याचा बेकायदेशीर शेड उभारुन हॉटेलचा व्यवसाय चालविला जात आहे. राजकीय दबावाखाली ही कारवाई टाळली जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. 

महापालिकेकडे हॉटेल मालकाने जागे संदर्भात कुठलेही पुरावे सादर केले नसून, उच्च न्यायालयात मनाईहुकूमसाठी दावा दाखल केला असता सदरचा मनाईहुकूम रद्द झालेला आहे. तरी तातडीने महापालिकेने हे अतिक्रमण काढण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget