DNA Live24 2015

जैन इरिगेशनने अधिग्रहित केली कॅलिफोनिर्यातील इटीवॉटर कंपनी


नव तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात भर पडेल – अनिल जैन

जागतिक पातळीवर लौकिक प्राप्त केलेल्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.च्या इरिगेशन इन्कॉर्पोरेटेड (आयएनसी) या अमेरिकेतील उपकंपनीने 5 सप्टेंबरला फ्रेस्नो, कॅलिफोर्निया येथील इटीवॉटर ही कुशल सिंचन तंत्रज्ञान कंपनी अधिग्रहित केली आहे. इटीवॉटर ही कंपनी पाणी टंचाईबाबत ग्रामीण ते जागतिक समस्या सोडविण्याचे काम करते. परीपूर्ण क्लाऊड-बेस्ड प्लॅटफॉर्म असलेली ही कंपनी जैन इरिगेशनने अधिग्रहित केल्याने जगातील पाण्याची कार्यक्षमता वाढीस लागणार आहे.

इटीवॉटर ही कंपनी माहिती शास्त्र, मशिन भाषा, प्रेडिक्टीव्ह अॅनॅलिटीक्स हवामानाचा अंदाज, वातावरणातील परिवर्तनशील घटक स्वयंचलितपणे सानुकुल करण्यासाठी विशिष्ट सिंचन वेळापत्रकांत जुळवून घेण्याचे कार्य करते. इंटरनेटव्दारा जुळणी केल्याने इटीवॉटर मार्फत पाण्याचे स्मार्ट कंट्रोलर्स, सुरक्षित सेल्युलर डेटा नेटवर्क्सव्दारे वेळापत्रके मिळतात, त्यामुळे शेतकऱ्यांना (उपभोक्त्यांना) मोबाईल किंवा स्मार्ट उपकरणांव्दारे त्यावर देखरेख आणि नियंत्रण करता येते.

इटीवॉटरचे सीईओ पॅट मॅकींटायर म्हणतात, “आम्हाला अमेरिकेतील बाहेरच्या पाणी बचतीच्या संसाधनांच्या बाजारपेठेवर सकारात्मक परिणाम केल्याचा खास अभिमान आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सिंचनाच्या आवश्यकतेविषयी जाणीव निर्माण केली आहे. 100 राष्ट्रीय फॉरच्यून किरकोळ विक्रेते आणि कुटुंब घरमालक त्यांच्या पाण्याच्या कार्यक्षमता स्वयंचलितपणे सूधारण्याची जबाबदारी आमच्यावर सोपवतात. आम्ही ग्राहकांची जमीन (लँडस्केप्स), आरोग्यपूर्ण आणि सुंदर ठेवून त्यातील कचऱ्याचा नायनाट करतो. ग्राहकांचा पाण्यावरील होणारा खर्च कमी करण्यासाठी इटीवॉटर ही कंपनी प्रयत्न करत असते. जैन इरिगेशनने इटीवॉटरचे अधिग्रहण केल्याने संपूर्ण अमेरिकेतील आणि जगातली पाण्याची कार्यक्षमता वाढेल आणि ते जागतिक शाश्वत पाणी व्यवस्थापनातील ते सुवर्णमानक होईल असा विश्वास वाटतो.”

“शेतीच्या क्षेत्रात इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात जैन इरिगेशन अग्रभागी आहे. इटीवॉटरमुळे शेतीमध्ये पाण्याच्या वापरात सुधारणा होईल, तसेच सिंचनात वाया जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी करता येईल,” असे जैन इरिगेशन इन्कॉर्पोरेटेडचे अध्यक्ष एरिक ओल्सन यांनी सांगितले.

“सिंचन देखरेख आणि नियंत्रण यामध्ये जैन इरिगेशनचे नेतृत्व आहे. इटीवॉटरला आमच्या कुटुंबात आल्याबद्दल अभिमान वाटत आहे. सिंचन तंत्रज्ञान अधिग्रहित केलेल्या असंख्य कंपन्यांमध्ये स्मार्ट सिंचन नियंत्रणातील अग्रेसर इटीवॉटरच्या वाढीमुळे आमच्या विस्तारीत ग्राहकांमध्ये भर पडेल. रिचर्ड रेसट्यूशिया ह्या गटाचा प्रमुख आहे. जल व्यवस्थापन स्मार्ट कंट्रोलर्स आणि तंत्रज्ञानात त्यांचा अभ्यास चांगला आहे. जैन इरिगेशन आयएनसीत प्रवेश करण्यापूर्वी 2014 साली रिचर्ड व्हॅलीक्रेस्ट (आता ब्राईटव्ह्यू) कंपन्यांत (अमेरिकेतील सगळ्यात मोठा भूदृश्याचा कॉँट्रॅक्टर) जल व्यवस्थापनाचे संचालक होते. त्यांनी भूदृश्य सिंचनात आमुलाग्र बदल केला असल्याचे जैन इरिगेशन इन्कॉर्पोरेटेडचे अध्यक्ष एरिक ओल्सन यांनी सांगितले.

वनस्पती शास्त्र संशोधनात आयएनसीची आघाडी
जैन इरिगेशनची अमेरिकेतील उपकंपनी जैन इरिगेशन इन्कॉर्पोरेटेड (आयएनसी) ही कंपनी संपूर्ण एकात्मीक जागतिक अन्न, वनस्पती निर्माण करणारी कंपनी असून जगातील पाच जागतिक शाश्वततेची जी-20 मध्ये समाविष्ट असलेली कंपनी आहे. लोकांना गरिबीतून बाहेर काढणारी जी-20 मधील कंपनी आहे. सिंचन उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासाठी ठिंबक संच, पंपापासून ते फ्लश व्हॉल्वपर्यंत सर्व उत्पादनांची निर्मिती कंपनीच्या माध्यमातून केली जाते. एक्सट्र्यूजन आणि मोल्ड मशिनींचे निर्माण करणाऱ्या कंपन्या आमच्याकडे आहेत त्यामुळे आम्ही उत्पादन तंत्रज्ञानात आघाडीवर आहोत. वनस्पती शास्त्रातील संशोधन करण्यात जैन जगात आघाडीची कंपनी आहे. अन्नधान्यातील जगातील संशोधक शास्त्रज्ञ जैन इरिगेशनमध्ये आहेत.

इटीवॉटर ही स्मार्ट कंट्रोलर बनविणारी व शेतकऱ्यांना पाणी, शेतीसंबंधीत क्लाऊड-बेस्ड प्लॅटफार्मद्वारे निरीक्षण व संयमन करणे अशा सुविधा देणाऱ्या अमेरिकन कंपनीचे अधिग्रहण ही महत्त्वपूर्ण बाब म्हणता येईल. यापूर्वी देखील विदेशातील कंपन्यांचे अधिग्रहण झालेले आहेत परंतू तांत्रिकदृष्ट्या अत्यंत पुढारलेल्या या कंपनीची साथ लाभल्याने आता शेतीसाठी डिजिटल, आयओटी व आयसीटीचा वापर करून तंत्रज्ञान पुरविणे या मोठा दबदबा निर्माण होईल. भारतीय शेतकऱ्यांना सुध्दा उच्च कृषी तंत्रज्ञान अत्यंत फायद्याचे ठरेल यात शंका नाही. या अधिग्रहणाने कंपनीचा आवाका तर वाढलेला आहे परंतू पुढारलेल्या तंत्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीत भर पाडण्याचे व शाश्वतता आणण्याचे काम करेल.

- अनिल जैन
कार्यकारी संचालक,
जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. जळगाव

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget