DNA Live24 2015

बाजार समितीच्या आडून विधानसभेवर डोळा..!

पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने सध्या राजकीय कुराघोडीची परिसीमा गाठली आहे. सभापती प्रशांत गायकवाड यांना हटवून नव्या गाड्याकडे सूत्रे देण्यासाठीची ही लढाई आहे. यासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे यांच्या गटाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तर, प्रतिडाव टाकताना गायकवाड यांनीही संचालकांची मोट बांधून आपली ताकद दाखवून दिली आहे.

एकाच वर्षात नवीन संचालकास सभापती पदावर बसवून विधानसभा निवडणुकीत विजयाची दावेदारी करण्याचा डाव झावरे गटाचा होता. तर, आमदार विजय औटी यांनी ही सहकारी संस्था ताब्यात घेऊन आपली विजयाची डावेदारी पक्की करण्यासाठी तयारी ठेवली होती. मात्र, त्याचवेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख निलेश लंके यांनी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून ही लढाई दुरंगी नसून तिरंगी होण्याचा संदेश दिला.

आमदार औटी, झावरे व लंके यांची तयारी जोमात सुरू असतानाच बाजार समितीचे सभापती गायकवाड यांनी वडील सबाजीराव यांच्याप्रमाणे विधानसभेत जाण्याचे स्वप्न जवळच्या कार्यकर्त्यांना बोलून दाखविले. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी कांग्रेसकडूनही दोघेजण दावेदार तयार झाल्याचे चित्र निर्माण झाले. अशावेळी लंके यांना पक्ष सोडावा लागला होता. त्यामुळेच आता राष्ट्रवादीला झावरे की गायकवाड यांना सोडचिठ्ठी द्यावी लागणार, याची चर्चा जोरात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget