DNA Live24 2015

ऊस वाहतूक ठेकेदारांची निदर्शने

अहमदनगर :
साखर उत्पादन उद्योगातील महत्त्वाचे घटक असलेले ऊस वाहतूक ठेकेदारांवर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रमसिंग भोसले, पोपट तोरकड, राजेंद्र लोंढे, युवराज मोरे, उमाकांत नलगे, सुभाष बळे, गोकुळ इरकर, उत्तम गरड, दादासाहेब सुरवसे, रमेश दळवी, देविदास खानवटे, लक्ष्मण खानवटे, सुनील गोडसे, तात्यासाहेब माने, राहुल माने, वसंत खानवटे, परशुराम गोडसे आदिंसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.     

ऊस वाहतूक ठेकेदारांवर कारखानदार कडून वर्षानुवर्ष अन्याय केला जातो. गेल्या पंधरा-वीस वर्षापासून ऊस वाहतुकीचे दर हे होणार्‍या वाहतूक खर्चाच्या प्रमाणात वाढलेले नाही. सध्या डिझेल दर, आरटीओ टॅक्स, इन्शुरन्स, ड्रायव्हर पगार आदि खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊसतोड मजूर मुकदम यांची पूर्ण जबाबदारी वाहनचालकावर टाकलेली असल्यामुळे वाहनचालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. महाराष्ट्रातील सर्व ऊस वाहतूक ठेकेदार आंदोलनाच्या पवित्र्यात असून, जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत वाहतूक ठेकेदाराचे एकही ट्रक किंवा ट्रॅक्टर कारखान्याला जाणार नसल्याचा इशारा देण्यात आला आहे.

वाहतूक व कमिशन दर दुप्पट करून महाराष्ट्रातील सर्व कारखान्यांना एकच दर लागू करावे, ही दरवाढ दरवर्षी सुधारित करण्यात यावी, ऊस वाहतूक ठेकेदार व ऊस तोडणी ठेकेदार यांचे स्वतंत्र करार करावे, अ‍ॅडव्हान्सची रक्कम वाहतूक ठेकेदारांना एक रकमी देण्यात यावी, अ‍ॅडव्हान्ससाठी कर्ज प्रकरण करताना हे कर्ज प्रकरणे बँकांनी थेट वाहतूकदारा सोबत करावी, कारखान्यांनी दुहेरी करार करून कारखान्याची वाहतूक, दर, कमिशन आदिंचा करारात उल्लेख करुन हा करार वाहतूकदारांना लेखी स्वरूपात द्यावा, कारखाना बंद झाल्यानंतर सर्व हिशोब करून निघणारे बिल कमिशन डिपॉझिट बक्षीस रक्कम 15 दिवसाच्या आत वाहतूकदारांना देणे बंधनकारक करावे, अ‍ॅडव्हान्सची रक्कम फिटल्यानंतर दर पंधरवड्याला होणारे बिल वाहतूकदारांना नगदी देण्यात यावे, सर्व सामानाचा खर्च कारखान्यांनीच उचलावा, प्रत्येक कारखान्यावर वाहतूकदारांसाठी विश्रामगृहाची सोय करण्यात यावी, कारखाना बंद झाल्यावर कराराच्या वेळी घेतलेली सर्व कागदपत्रे वाहतूकदारांना परत करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांना देण्यात आले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget