DNA Live24 2015

"मराठवाडा मुक्ति संग्राम" नव्हे " हैदराबाद मुक्ति संग्राम" ……………।


हैदराबाद संस्थान हे मराठवाडयातील औरंगाबाद , बीड ,परभणी ( हिंगोली ), नांदेड उस्मानाबाद ( लातूर ) , तेलांगना-आन्ध्र मधील हैदराबाद ,आदिलाबाद ,महबूबनगर ,करीमनगर ,वारंगल , मेंडक ,नाल्गौंडा , निजामाबाद आणि म्हैसूर-कर्नाटक मधील गुलबर्गा ,रायचूर आणि बीदर यांचे मिळून बनले होते! 

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढलेला लढा हा, फ़क्त मराठवाडयापुरता मर्यादित नव्हता तर तो सम्पूर्ण हैदराबाद मुक्ति साठी होता.

आजच्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेम्बर १९४८ ला सम्पूर्ण हैदराबाद संस्थान  मुक्त झाले. या लढ्यास जर मराठवाडा मुक्तीसंग्राम नाव द्यायचे असेल तर  मग हा दिवस तेलंगाना मधे तेलंगान मुक्तिसंग्राम ,  गुलबर्गामधे गुलबर्गा मुक्ति संग्राम म्हणून साजरा करावा लागेल! 

स्वामी रामानंद तीर्थ हे केवळ मराठवाडयाचे नव्हेतर सम्पूर्ण हैदराबाद संस्थांतील जनतेचे नेते होते. अगदी लोहारा तालुक्यातील छोट्या गावातील स्वातंत्र्य सैनिक ही  सम्पूर्ण हैदराबाद मुक्त करण्यासाठी लढत होता , मग त्याने हा दिवस लोहारा मुक्ति दिन म्हणून साजरा करायचा काय ? आणि याच न्यायाने पहायचे म्हटले तर , मग १५ ऑगस्ट सुद्धा प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने साजरा करावा लागेल!  कुठे राजस्थान स्वातंत्र्य दिन, कुठे पंजाब स्वातंत्र्य दिन तर कुठे बिहार स्वातंत्र्य दिन! 

म्हणून आजचा दिवस हा "हैदराबाद मुक्ति संग्राम दिन"  आहे, आणि तो याच नावाने गौरवायला हवा !!!!!!!!!!
© राज कुलकर्णी .
Raj Kulkarni
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget