DNA Live24 2015

जनतेला शुध्द पाणीमिळण्यासाठी ‘स्वजल’ योजना : व्ही. राधा

पुणे :
ग्रामीण भागातील प्रत्येकाला पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी आणि इतर घरगुती वापरासाठी स्वच्छ व सुरक्षित पाणी मिळावे हाच ‘स्वजल’ योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या सह सचिव श्रीमती व्ही. राधा यांनी केले.

युनिसेफ, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था, पेयजल आणि स्वच्छता मंत्रालय, भारत सरकार आणि ‘स्वजल’ योजना यांच्या संयुक्त विद्यमाने येथील हॉटेल क्राऊन येथे आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय ‘स्वजल’ कार्यशाळेला आज सुरूवात झाली. या कार्यशाळेत श्रीमती व्ही. राधा बोलत होत्या. या कार्यशाळेला युनिसेफचे निकोलस ऑसबेर्ट, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड, केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे उप सचिव श्रीमती रणजीथा यांच्यासह विविध राज्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रीमती व्ही. राधा म्हणाल्या, स्वजल योजनेबाबत पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने सुधारित मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये योजनेची कार्यान्वितता, मांडणी, आर्थिक तरतुद, योजनेच्या भागधारकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या यांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक गरजेनुसार त्यात लवचिकता ठेवण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्यात आला आहे. ही योजना गुणात्मक आणि दर्जेदारपणे चालावी हाच या मागचा उद्देश आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget