DNA Live24 2015

"खानेवालेको भागने दुंगा!"


आपण भारत सोडून लंडनला पळून येण्याच्या आदल्या दिवशी अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटलो होतो, असं खळबळजनक विधान विजय मल्ल्या याने दोन दिवसांपूर्वी लंडनमध्ये दंडाधिका-यांच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना केलं. अर्थात, मोदी, शहा आणि जेटली यांना दरदरून घाम फुटला असणार. ज्याच्यावर भारतीय सरकारी बॅंकांचे ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे, ज्याच्यावर सीबीआय ने गुन्हा दाखल केला आहे, ज्याच्यावर परदेशात जाताना पकडण्याचा आदेश आहे असा माणूस साक्षात अर्थमंत्र्यांना भेटून पलायन करतो ही गोष्ट कल्पनेच्या पलिकडे आहे.
_______________________

या प्रकरणाचे पदर जसजसे उलगडत जातायत त्यामुळे सामान्य माणसाचा आता सरकारवरचा विश्वास संपूर्ण उडून जाईल. काय आहेत हे पदर?

● मल्ल्यासाठी सीबीआय ने विमानतळांवर 'लुकआउट नोटिस', म्हणजे तो परदेशी जाणा-या विमानात बसत असेल तर त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश काढला होता. आता उघडकीला येत आहे की तो शिथिल करण्यात आला होता. सीबीआय ने हे कुणाच्या सांगण्यावरून केलं हे अद्याप गुपित आहे.
● सीबीआयचं म्हणणं असं की एका कनिष्ठ अधिका-याकडून ते नजरचुकीने झालं. शेंबड्या पोराचा तरी यावर विश्वास बसेल काय?
● ज्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे सर्वाधिक पैसे (२ हजार कोटी रुपये) त्याने बुडवले आहेत त्या स्टेट बँकेच्या अधिका-यांना काहीतरी सुगावा लागला असावा. कारण ...
● घायकुतीला येऊन त्यांनी मार्च २०१६ मध्ये प्रख्यात वकील दुष्यंत दवे यांची भेट घेतली. सहसा रविवारी कुणालाही न भेटणारे दवे यांची त्यांच्याशी तासभर चर्चा झाली. बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी आणि तिचे कायदेविषयक सल्लागार या बैठकीला हजर होते.
● एकूण आढावा घेतल्यानंतर दवे यांनी, मल्ल्याचा पासपोर्ट जप्त करण्याची याचिका अत्यंत चपळाईने सुप्रीम कोर्टात दाखल केली पाहिजे, असा सल्ला दिला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, कोर्ट तसा आदेश नक्की देईल असा विश्वास सुद्धा व्यक्त केला. बॅंकेचे अधिकारी तयार झाले.
● ठरल्याप्रमाणे दुस-या दिवशी सकाळी १० वाजता कोर्टात भेटायचं ठरलं. दवे हजर झाले. त्यांनी खूप वाट पाहिली. पण बॅंकेचा एकही अधिकारी आला नाही.
● त्याच दिवशी दुपारनंतर मल्ल्या इंग्लंडला पळाला. ही सारी पलायनगाथा खुद्द दवे यांनी टीव्ही वर सांगितली.
● मल्ल्या म्हणतो; आपण कर्जाच्या मुद्दलाची ५ हजार ४०० कोटी रुपये रक्कम भरायला तयार होतो. पण जेटली तयार नव्हते. हे खरं असेल तर जेटली यांनी तातडीने राजीनामा द्यावा. चोराच्या हातची लंगोटी म्हणून किमान ते पैसे स्वीकारायला हवे होते. व्याजाचं नंतर पाहता आलं असतं. एकतर एका घोषित गुन्हेगाराला देशाच्या अर्थमंत्र्यांनी खाजगीत भेटणं हेच गैर आहे. वर येणारे पैसे नाकारणं म्हणजे शहाणपण नाही आणि इच्छा सुद्धा नाही हेच सिद्ध होतं.

स्थानबद्धतेची नोटिस गायब होते, बॅंकेचे अधिकारी कोर्टात फिरकत नाहीत आणि मल्ल्या ५० बॅगा भरुन फरार होतो. आदल्या दिवशी अर्थमंत्री अरूण जेटली यांना भेटलो होतो म्हणून सांगतो, हे सारं डोकं सुन्न करणारं आहे. भारताचे माजी महाभियोक्ता (अॅटाॅर्नी जनरल) मुकुल रोहटगी हे सुद्धा परवा म्हणाले की सीबीआय ने त्याचा पासपोर्ट जप्त करून घ्यायलाच हवा होता. रोहटगी कायम सरकारची भलामण करतात. सबब, त्यांचं हे परखड मत फार महत्वाचं आहे. नीरव मोदी, विजय मल्ल्या, मेहुल चोकसी लोकांचा पैसा लुटून डोळ्यादेखत पळून जातात पण सरकार त्यांना अडवू शकत नाही. हे सरकार परदेशातला काळा पैसा आणू अशा गमजा मारतंय. कसा विश्वास ठेवायचा? या तिघांपेक्षा मोठे कर्जबुडवे आजही भारतातच आहेत. त्यांच्यावर काय कारवाई झाली? एक तर एका संरक्षण प्रकल्पात सरकारचा भागीदार बनलाय.

"ना खाऊंगा ना खाने दुंगा, मगर खानेवालेको भागने दुंगा!"

#बाळासाहेब_थोरात

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget