DNA Live24 2015

राज्यावर दुष्काळसंकट..!

पुणे :
मागील वर्षी भरघोस पाऊस होऊनही आताच्या राज्यातील बहुसंख्य भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान राबवूनही पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर वाढल्याने आणि वेळेवर मुबलक पाऊस न झाल्याने आता राज्यावर  दुष्काळसंकट ओढवले आहे.

राज्यात २०१४ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. आता त्याची चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर पाचव्या वर्षी पुन्हा  सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्याच्या बहुतांश भागात दुष्काळसदृश स्थिती आहे. कोरड्या सप्टेंबरमुळे मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. नांदेड वगळता इतर सात जिल्ह्यांत पावसाची तूट लक्षणीय वाढली आहे. तसेच राज्यातील एकूण १५ जिल्ह्यांत पावसाअभावी स्थिती चिंताजनक आहे. त्यातच भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) नैऋत्य मान्सून देशातून परतण्यास २९ सप्टेंबरपासून सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे हे दुष्काळसंकट आणखी गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget