DNA Live24 2015

शिक्षकांच्या संस्कारामुळे समाज सावरला आहे : भागचंद जाधव

अहमदनगर :
मगाव वाघा (ता.नगर) येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गावातील नवनाथ विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भागचंद जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे, प्र.मुख्यध्यापक किसन वाबळे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, गोविंद बोरुडे, दत्तात्रय जाधव, चंद्रकांत पवार, उत्तम कांडेकर, शुभांगी धामणे, मंदा साळवे, तुकाराम खळदकर, लहानबा जाधव, श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे आदिंसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भागचंद जाधव म्हणाले की, राष्ट्र निर्माणाचे कार्य शिक्षक करीत असतात. त्यांच्यामुळे सुजान पिढी घडत असते. शिक्षक हा आपल्या विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवितात. शिक्षकांच्या संस्कारामुळे समाज सावरला असून, गुरु शिवाय जीवन व्यर्थ असल्याचे त्यांनी सांगितले. साहेबराव बोडखे यांनी शिक्षकांनी घडविलेले गावातील अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवीत आहे. त्यांनी केलेल्या संस्कारामुळे सक्षम पिढी घडल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षकांचा सत्कार करुन कृतज्ञता व्यक्त केली. तर एक दिवस अध्यापनाचे कार्य करुन आलेले अनुभव विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन काशीनाथ पळसकर यांनी केले. आभार पै.नाना डोंगरे यांनी मानले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget