DNA Live24 2015

Blog | पेट्रोलच्या 'अच्छे दिन'साठी 'रामबाण' उपाय...

पेट्रोलचे भाव रू.92 प्रति लिटर झाले आहेत. जनता एवढ्या  महाग पेट्रोल किंमतीवर नाराज आहे. पेट्रोल परवडत नाही, असा देशद्रोही जनतेचा कांगावा आहे. यावर मला सरकारला उपयुक्त ठरेल असा एक रामबाण उपाय सुचला  आहे ! 

उपाय असा की, 100  मीटर म्हणजे एक किलोमीटर अशी परीमाण पद्धती आणून 100 शंभर मीटरवर 1 किलोमीटरचा दगड रोवण्याचे कॉंट्रक्ट जर रस्ते बनविण्यात वाकबगार असणा-या केंद्रीय मंत्र्याच्या कंपनीस दिले तर पुर्वी पेट्रोल 70 रू असताना प्रति लीटर 50 किमी अॅव्हरेज देणारी मोटारसायकल  रू 92 पेट्रोलचा भाव असताना प्रति लीटर 500 किमी अॅव्हरेज देऊ शकते! तर पुर्वी 20 किमी प्रतिलीटर अॅव्हरेज देणारी कार प्रतिलीटर 200 किमी अॅव्हरेज देईल! 

मग काय आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे

शिवाय दगडे रोवण्याच्या कामामुळे नवीन रोजगार निर्मितीही होईल आणि महत्वाचे म्हणजे यातून भक्तांना अच्छे दिनातील पेट्रोल भाववाढीचे आकडेवारीसह अगदी बीनतोड समर्थन करता येईल! 

विरोधकांची तोंडे बंद करण्याचा यापेक्षा दुसरा कोणताही 'रामबाण' उपाय नाही.

© राज कुलकर्णी.
Labels:

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget