DNA Live24 2015

Blog | शेतातलं ट्रॅक्टरपुराण...

बरोबर आठ दिवसांपूर्वी गावातल्या एका ट्रॅक्टर व्यावसायिकाला फोन केला. दोन एकर नांगरटी करायचीय. त्यानं १६००रू. एकरचा भाव सांगितला. डिझेलला अॅडव्हान्स १५००रु. द्या, असं तो बोलला. मी म्हटलं, शेतात ट्रॅक्टर आलं की, लगेच पैसे देतो. दहा मिनीटात त्याचा फोन आला...

ट्रॅक्टर निघालयं बघा. मी नरेशला फोन करून कल्पना दिली. मी हा विषय डोक्यातून बाजुला सारला. माझ्या कामाला लागलो. साधारण दिड तासाने नरेशचा फोन आला... मामा, ट्रॅक्टर आलं नाही. मी त्या ट्रॅक्टर मालकाला फोन लावला. दोन वेळा त्याने फोन उचलला नाही. तिसऱ्यांदा उचलला... मी विचारलं, काय झालं ट्रॅक्टरचं?

...तो बोलला..काय सांगू सर मी पोराला पाठवलं होतं. बसस्टॅंडजवळच ड्रायव्हर दारू पिऊन पडलयं. आता काही उपयोग नाही. मी सकाळी नक्की पाठवतो. मी म्हटलं, हे तू मला सांगायला नको?...सांगून काय फायदा?... म्हणत फोन ठेवला. विशेष म्हणजे याच्याकडं दोन ट्रॅक्टर आहेत.
सकाळी आठ वाजता फोन लावला. फोन बंद होता. पुन्हा दोन वेळा प्रयत्न करून नाद सोडला. आमच्या शेजारच्या ट्रॅक्टर मालकाला फोन केला. त्यांच्या कामात त्यांना सवड नव्हती. माझ्याकडं  व्यवसाय करणाऱ्या चार ट्रॅक्टर मालकाचे फोन होते.स गळ्यांना फोन केले. कोणाचा चालक सुट्टीवर होता, कोणाचा ट्रॅक्टर दुरूस्त नव्हता. एकजण उद्या येतो म्हणाला. एकानं फोन उचलला नाही... पुन्हा नाद सोडला.

चार-पाच दिवसांनी नरेशला विचारलं, अरे तेवढं ट्रॅक्टर बघ ना, बोरुचं नांगरण राहून चाललयं. तो हो म्हणाला. आणखी दोन दिवस गेले. आज सकाळी डोंगरावर फिरायला जाताना पुन्हा आठवलं, नांगरटी राहूनच गेलीय... आठ दिवसांपूर्वी ज्याला फोन केला होता त्याच ट्रॅक्टर मालकाला पुन्हा फोन लावला. दोनवेळा लागला नाही. तिसऱ्यांदा लागला पण उचलला नाही. नरेश गावात दुध घेऊन चालला होता. मी त्याला म्हटलं, तेवढं ट्रॅक्टर बघचं... गावात त्यानं चार-पाच जणांशी चौकशी केली. प्रत्येकाचं वेगळं कारणं.एकजण तयार झाला. आॅईल गळालयं... तेवढं काम करून चार वाजता येतो. नरेशनं मला हे सांगीतलं...

चार वाजताच्या आश्वासनाचं काय खरं?
मी  न राहवून आमचे शेजारी मित्र बबन बिलापटे यांना फोन करून ट्रॅक्टर पाठवायला सांगीतलं. त्यांनी पाठवलला. त्यानं एक मुरडण हाणली.. कापलेला बोरू एका जागी गोळा होऊ लागला.....
ह्याला रोटर केल्याशिवाय नांगरटी होत नाही. रोटर होऊ द्या... मी दुपारी येतो म्हणून तो  गेला. तो अद्याप परतला नाही...
अॅडव्हानस तीन हजार रूपये नेलेत व नांगर इथंच ठेऊन गेलाय...त्या मुळं तो उद्या येईलच...
प्रश्न आहे व्यावसायिकतेचा... कामाशी निष्ठा असण्याचा,किमान सभ्यता पाळण्याचा.... यांच्याशी कोणालाच देणंघेणं नाही.
ज्या गावात व्यवसाय करणारे किमान पंधरा-वीस ट्रॅक्टर आहेत तिथली व्यावसायिकता अशी आहे...
अशा समाजात शेतीला उद्योगाचा दर्जा देण्याची मागणी हास्यास्पद ठरते.

@महारुद्र मंगनाळे

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget