DNA Live24 2015

Bolg | पाचगणीतील राजपुरी गुंफांमध्ये महिलांना प्रवेश का नाकारला जातो?

पाचगणीतील राजपुरी गुंफांमध्ये महिलांना प्रवेश का नाकारला जातो?
Women are not allowed inside #Rajpuri caves in #Panchgani #Mahabaleshwar

नुकतीच पाचगणी, महाबळेश्वरला धावती भेट दिली. इंटरनेटवर वाचताना सर्व रिव्ह्यूमध्ये एक समान माहिती वाचण्यात आली. राजपुरी गुंफांमध्ये महिलांना प्रवेश मिळत नाही. म्हणून खास वेळ काढून याठिकाणी गेले. कार्तिक देवाची मूर्ती सहापैकी एका गुंफेमध्ये आहे. त्यामुळे तीन वर्षांतून एकदाच महिलांना या गुंफामध्ये प्रवेश मिळतो. महिला तिथे गेल्या तर साप निघतात, विधवा होतात इथपासून अनेक अंधश्रद्धा सांगण्यात आल्या. कुलूप उघडलं नाही. मला गुंफुमध्ये जाता आलं नाही. महाबळेश्वर आणि पाचगणीची जनता मनमिळावू, कष्टाळू, प्रेमळ, पर्यंटकांचं स्वागत करणारी आहे. कुणाहीबद्दल राग नाही. पण अशा अंधश्रद्धांना आपण किती दिवस कवटाळून बसणार आहोत. या गुंफा ग्रामपंचायत सांभाळते. 10 व्या आणि 11व्या शतकातील या गुंफाची जवाबदारी आर्किओलोजिकल डिपार्टमेंट केद्रांचं किंवा राज्याचं का घेत नाही, याचाही शोध घेतला पाहिजे. 2018 मध्ये महिलांना गुंफा प्रवेश नाकारला जात असेल तर त्याविरोधात लिहिलं पाहिजे, हे माझं कर्तव्य आहे. यासाठी ही पोस्ट.

गुंफेच्या ठिकाणी लिहिलेली माहिती -

सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात असलेल्या पर्वतरांगांमध्ये जावळी प्रांत हा अतिशय दुर्गम व घनदाट जंगलाचा आहे. पूर्वीचा सातारा जावळी, आता आपण त्याला महाबळेश्वर असे म्हणतो. याच तालुक्यात पाचगणीशेजारी 7 किमी अंतरावर राजपुरी हे गाव डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. वाईपासून जवळ असलेल्या वाबधन गावाच्या नैऋत्येस सुमारे पाच मैल अंतरावर गाव आहे. समुद्रसपाटीपासून 4378 फूट उंचीवर हे स्थान आहे. तेथे जाण्यासठी मात्र चांगला रस्ता आहे. गावची लोकसंख्या ही जेमतेम 1500 पर्यंत आहे. याठिकाणी लोकांचा शेती हा पूर्वपार व्यवसाय लोक नित्यनेमाने करत आहेत. गावाचे ग्रामदैवत वाकडेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे.

हे गाव जावळी तालुका, वाई तालुका तसेच महाबळेश्वर तालुका या तीन तालुक्यांच्या सीमेवर आहे. गाव संपूर्ण डोंगरउतारावर आहे. याच डोंगरउतारावर गावाच्या खाली एक प्रचंड 100 ते 125 फूट मोठा काळ्या पाषाणातीत डोंगरकडो आहे. या कड्याला लागून 6 कोरीव खोदलेल्या गुंफांचा समूह आहे.

 या गुंफाना 1885 मध्ये एच आर कुक नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने प्रथम भेट दिली. मुमसाई गॅझेटमध्ये त्याने पहिल्यांदा या गुंफेची नोंद केली आहे. या गुंफाशेजारी गावातून येणारा जवळपास 80 पायऱ्यांचा मार्ग आहे. तो मार्ग राष्ट्रसंत गाडगेबाबा यांनी 1943 साली बांधला. 1943 साली गाडगेबाबांचे या गावात 15 दिवस वास्तव्य होते. गावातील दलित समाजाच्या मदतीने त्यांनी या पायऱ्या बांधल्या. त्याचेच फलित म्हणून गावाला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला आहे. 1963 साली इतिहास संशोधक ग. ह. खरे यांनी या स्थानाला भेट दिली. त्याठिकाणी त्यांनी देवनागरी – पाली भाषेतील शिलालेखांचे वाचन केले.

वगैरे बरीच असणारा एक बोर्ड स्थानिकांनी इथे लावलाय. कार्तिकेय स्वामींनी महिलांना दिलेला शाप आणि उशाप यामुळे महिलांना असलेल्या गुंफाबंदीचं समर्थन आणि 3 वर्षांतून एकदा दिला जाणारा प्रवेश याबद्दलची माहितीही वाचायला मिळते.

गावकऱ्यांना, ग्रामपंचायतीला, तिथल्या लोकप्रतिनिधींना आणि सरकारला विनंती आहे की महिलांना राजपुरी गुंफामध्ये पुरुषांप्रमाणेच नियमित प्रवेश मिळावा.

इतिहास संशोधन करणाऱ्या, अभ्यासू, जाणकार, आर्किओलॉजीचा अभ्यास करणाऱ्या महिलांना या गुंफेत प्रवेश करण्यासाठी यात्रेची वाट बघत बसायला लावणं अमानवी आहे. महिला – पुरुष भेदाभेद देवाच्या नावावर करु नये.


पत्रकार अलका धुपकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10157620532423368&id=835428367

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget