DNA Live24 2015

पीकसल्ला I टॉमटो किडरोग व्यवस्थापन (भाग 5)


शरिरासाठी पोषक असलेल्या अ, ब आणि क जिवनसत्वांसह चुना, लोह व विविध प्रकारच्या खनिजाने संपन्न असलेल्या टॉमेटोला वर्षभर मागणी असते. या पिकांवर करपा, फळसड, भुरी, मर, देवी, आदी विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासाठी एकात्मिक किडरोग व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करावे.

विषाणूजन्य रोग
टोमॅटो स्पोटेड विल्ट व्हायरस, पर्णगुच्छ अथवा बोकड्या व मोझॅक हे प्रमुख विषाणुजन्य रोग मोठ्या प्रमाणात आढळतात. टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस  रोगाची सूरूवात प्रथम शेंड्याकडून होते शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान तांबूस काळसर ठिपके चट्टे दिसतात रोगाचे प्रमाण वाढून तीन चार दिवसांत कोवळी पाने करपून काळी पडतात. या रोगाचा प्रसार फुलकिडे  (थ्रिप्स) या किडीमार्फत होतो. पर्णगुच्छ किंवा बोकड्या या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव लीफकर्ल व्हायरस या घातक लसीमुळेे होतो. बोकड्या रोगामुळे पाने बारीक, वाकडी-तिकडी होवून सुरूकुत्या पडल्यासारखी दिसतात. पानांचा रंग फि क्कट हिरवा पिवळसर होतो. यामुळे झाडाची वाढ खुंटते. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे होतो. टोमॅटो मोझॅक व्हायरस, कुकुंमबर मोझॅक व्हायरस, पोटॅटो मोझॅक व्हायरस या विषाणूमुळे टोमॅटोवर मोझॅक रोग आढळून येतो. या रोगामुळे पाने फि क्कट हिरवी होतात. ती बारीक राहून त्यामध्ये हिरवट पिवळसर डाग दिसतात. हा रोग संसर्गजन्य असल्यासमुळे टोमॅटोची  लागवड करतांना तसेच आंतरमशागतीची कामे करतेळी स्पर्शाने आणि मावा या किडीमार्फत रोगाचा प्रसार अतिशय वेगाने होतो.
विषानूजन्य  रोगांच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे गरजेचे असते. बियाणे पेरण्यापूर्वी कार्बोसल्फान अधिक ट्रायकोडर्मा प्रत्येकी 5 ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणात बिजप्रक्रिया करावी. लागवडीनंतर 15 दिवसांच्या अंतराने 15 मिली एंडोसल्फान किंवा मिथील डेमिटॉन 10 मिली किंवा कार्बोसल्फान 10 मिली या किटकनाशकांच्या प्रति 10 लिटर पाण्यातून 10 ते 15 दिवसांच्या अंतराने कराव्यात.
*
डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर मो. 9403189364
टॉमेटो सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget