DNA Live24 2015

पीकसल्ला I टॉमटो किडरोग व्यवस्थापन (भाग 6)


शरिरासाठी पोषक असलेल्या अ, ब आणि क जिवनसत्वांसह चुना, लोह व विविध प्रकारच्या खनिजाने संपन्न असलेल्या टॉमेटोला वर्षभर मागणी असते. या पिकांवर करपा, फळसड, भुरी, मर, देवी, आदी विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. रोगांच्या नियंत्रणासाठी वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे असते. त्यासाठी एकात्मिक किडरोग व्यवस्थापन पुढीलप्रमाणे करावे.

ब्लोझम एंड रॉट (फळाच्या टोकाची कूज)
कॅल्शियमची कमतरता असणार्या जमिनीत ही विकृती दिसून येते. पाण्याचा कमी अधिक पुरवठा, तापमानातील फरक, अतिरिक्त नत्राचा डोस, कमी निचर्याची जमिन, अमोनिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम यांच्या कमी-अधिक उपलब्धतेमुळे कॅल्शिअमचा पुरवठा कमी होतो. त्यामुळे हिरव्या टॉमेटो फळाच्या टोकाला मोठा काळपट डाग पडतो. या विकृतीच्या नियंत्रणासाठी डायकॅल्शियम फास्फेट 2 ते 3 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणात जमिनीतून मिसळून द्यावे. याऐवजी कॅल्शिअम क्लोराईड किंवा कॅल्शिअम नायट्रेट प्रत्येकी 50 ग्रॅम 10 लिटर पाण्यातून तीन ते पाच दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

*
डॉ. ज्ञानेश्वर क्षिरसागर मो. 9403189364
टॉमेटो सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget