DNA Live24 2015

Update | भाजप कार्यकर्त्यांचा भाजपविरोधी मोर्चा..!

सिन्नर (नाशिक) :
लोकशाही देशात न्याय मागण्याचा हक्क सर्वांना आहे. मात्र, हाच हक्क अनेकदा चेष्टेचा भाग बनतो. सिन्नरमध्येही असाच प्रकार होत असल्याने सोशल मीडियात हे प्रकरण जोरात चर्चेत आहे.

सिन्नर तालुका भाजप कार्यकर्त्यांनी आता राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या जाहीर मोर्चाचे नियोजन केले आहे. राज्यात भाजपचे सरकार आहे. त्याला केंद्रातील भाजप आणि मोदी सरकारचा वरदहस्त आहे. तरीही भाजप कार्यकर्ते वाऱ्यावर असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याची चर्चा आहेच. त्यातच पेट्रोल दरवाढ आणि शेतीच्या समस्यांमुळे नागरिक वैतागले आहेत. तर भाजप कार्यकर्ते यावर बोलणाऱ्यांना ट्रोल करीत आहेत. अशावेळी भाजप कार्यकर्त्यांचे प्रश्नही सुटत नसल्याचे सिन्नर भाजप आघाडीने आणखी अधोरेखित केले आहे.

उद्या मंगळवारी विविध शेती व ग्रामीण भागाच्या मागण्यांसाठी तालुका भाजपने मोर्चाचे नियोजन केले आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी होत असलेल्या या मोर्चाच्या पोस्टरवर मुख्यमंत्री, पंतप्रधान, महसूलमंत्री, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री आदींचे फोटो झळकत आहेत. याची तालुक्यासह राज्यातील सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget