DNA Live24 2015
October 2018


अहमदनगर :
येथील युवक काँगेस शाखेने राज्य सरकारच्या चार वर्षापूर्तीनिमित्त विशेष पोस्टर जारी केले आहे. निषेधासन नावाचे हे पोस्टर सध्या जोरदार चर्चेत आहे.

त्यात युवक काँग्रेसने म्हटले आहे की, ह्यांना कळते फक्त योगाचीच भाषा... राज्यातील खोटारड्या भाजपा सरकारच्या ४थ्या वर्षपूर्ती निमित्त...  महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेस करणार राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी ... #निषेधासन दि. ३१ ऑक्टोबर २०१८ सकाळी ८:३० वा.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्यासह बहुसंख्य फेसबुक पेजवरून हे पोस्टर जोरात शेअर होत आहे.इंदिराजींची हत्या झाली तेंव्हा मी तिसरीला होतो आणि दिवाळी सुट्टीसाठी म्हणून माझ्या आजोळी खेड या गावी होतो. पण त्या दिवशीची स्मृती अजूनही माझ्या मनात आहे. संध्याकाळची पाच सहाची वेळ होती आम्ही घरातील कांहीजण गावातील आबादानी नावाच्या भागातील एका सोनार आजोबाच्या घरी विठोबाच्या दर्शनाला गेलो होतो. येताना  मारूती मंदिरात दर्शनासाठी गेलो. नन्नी म्हणजे आई आणि शैला मावशी घरी गेल्या आणि मी मंदिरा जवळच्या एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली मित्राबरोबर थांबलो. तीथे एका रेडीओजवळ वीस पंचवीस माणसांचा घोळका होता. त्यावेळी समजलं इंदिरा गांधींना गोऴ्या घालून मारलं. इंदिरा गांधी कोण आहेत, काय आहेत हे कांही समजत नव्हतं. पण कांही तर गंभीर घडलंय एवढंच समजलं! लोक हळू हळू मारूती मंदिरापाशी गोळा होऊ लागले, सर्वजण याचीच चर्चा करत होते. अंधार पडू लागला तसे आम्हा पोरांना त्या सर्व लोकांनी घरी हाकालले. आम्ही घराकडे पळालो. घरी गेलो तर धनुमामा रेडीओ ऐकत बसला होता आणि घरातील सर्वजण रेडीओ शेजारी बसले होते. 'इंद्रा गांधीला मारलं' अशी चर्चा होती. तेवढ्यात गुरं घेऊन सालगडी नाना गुराच्या वाड्यात आले. तेही ओसरीपाशी येवून बसले. सातच्या बसने माझे आजोबा आण्णा आले आणि मग हळू हळू ढाळजत अनेक लोक जमा होऊन, यावर चर्चा सुरू झाली. इंदिराजींच्या हुशारीवर एवढा सर्वसामान्यांचा विश्वास होता की ज्यांना मारलं त्या ख-या इंदिरा गांधी नव्हत्याच, असेही कांही जण म्हणायचे. इंदिराजींची हत्या झाली त्यावेळी आम्हांला जेवायला घातलं पण आमच्या आण्णांनी मात्र जेवण केलेच नाही.  'बाई मोठी कर्तृत्ववान होती'  असे ते म्हटल्याचे मला आठवते. पुढे मी आठवीला गेल्यावर नेहरू वाचले त्यांच्या बरोबर त्यांची मुलगी म्हणून  इंदिराजींबद्दल वाचले ते तेवढेच पण त्यांचे  कर्तृत्व समजायला सोऴा वर्ष लागली. मात्र इंदिराजींचे कार्य व कर्तृत्व नेहरूंची मुलगी असे न पाहता स्वतंत्र राजकीय व्यक्तीमत्व म्हणून पाहू सन २००० पासून पाहू लागलो ते वाचनातून! 

इंदिरा गांधींवर कुमार केतकर, पिपुल जयकर, जयराम रमेश, पी.सी.आलेक्झांडर रामचंद्र गुहा, इंदर मल्होत्रा, अनिता इंदर सिंग यांची पुस्तके वाचली. त्याच प्रमाणे मधु लिमये यांनी सौहार्द या पुस्तकात 'मोहीनी अट्टम' हा इंदिराजीवर लिहीलेला लेख वाचला. प्रभाकर कुंटेंच्या 'माझे जीवन राजकारण' याचेही वाचन केले. या शिवाय महत्वपुर्ण म्हणजे नेहरूंनी इंदिराजींना लिहीलेली स्वतंत्र पत्रे आणि इंदिराजींनी नेहरूंना लिहीलेली पत्रे वाचली. 'लेटर्स ऑफ डॉटर' हा ग्रंथ सोनिया गांधींनी संपादीत केला आहे आणि तो वाचनिय आहे. ए.सी.एन.नंबीयार यांच्यावर ' A life in Shadow- The secret story of ACN Nambyar - a forgotten anticolonial warrior' हे वल्लाप्पा बालचंद्रन यांचेही पुस्तक वाचले. विशेषत: हे पुस्तक इंदिराजी आणि नेताजी बोस यांच्या स्नेहपुर्ण सबंधावर भाष्य करणारे आहे. इंदिराजी आणि नंबीयार यांचा पत्रव्यवहार हा १९३६ च्या व्हिएन्ना पासून ते त्यांची हत्या होण्याच्या केवळ दहा दिवस आधीपर्यंतचा आहे. नुकतेच मला 'Two faces of Indira Gandhi' हे उमा वासुदेव यांचे पुस्तक मिळाले आहे मात्र ते अद्याप वाचले नाही. पण इंदिरा गांधी जन्मशताब्दी समारोह समितीचा आयोजन समितीचा सदस्य म्हणून गेल्या वर्षभरात इंदिराजींची आणखी नवी ओळख झाली. त्यातून इंदिराजींची केवळ नेहरूंची कन्या ही ओळख पुर्णपणे पुसली गेली. त्या स्वयंप्रतिभावान अशा नेत्या होत्या.

नेहरूंच्या विचारांचा वारसा व प्रभाव असूनही त्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाच्या होत्या! नेहरूंचा लढा स्वातंत्र्यपुर्व काळात परकीय शक्तींशी होता व स्वातंत्र्योत्तर काळात ज्यासाठी स्वातंत्र्य मिळवले त्या उद्दिष्टांची पुर्तता करताना विरोधक निष्प्रभ होते. पण इंदिराजीसमोरची आव्हाने ही देशातील अशी विरोधकांची होती जे इंदिराविरोधासाठी कांहीही करण्यास उत्सुक होते. त्यामुळे इंदिराजींचा संघर्ष जास्त कठिण होता. 

इंदिरा गांधीं मोरारजी देसाईंना कॉग्रेस अंतर्गत झालेल्या निवडणूकीत पराभूत करून २४ फेब्रुवारी १९६६ रोजी  पहिल्यांदा पंतप्रधान झाल्या. त्यावेळी नुकतीच त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यास सुरूवात झाली  होती. व्ही.के. नारसिंम्हन  त्यांच्या ‘Kamraj-A study’ या पुस्तकात म्हणतात “ ….... there was general welcome to her election not only as Nehru’s Daughter but also as a Leader in her own right” परंतु  नेहरू प्रमाणेच इंदिरा गांधींनाही पक्षातून सतत विरोध होत राहीला.सन १९६७ सालीच जुनी कॉंग्रेस म्हणून के.कामराज यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा गांधींना विरोध करण्याचे धोरण आखले गेले होते. कॉंग्रेस (आर) हा पक्ष इंदिराजींचा समर्थक होता. मोरारजी देसाई , निजलिंगप्पा, के. कामराज हे इंदिराजीच्या विरोधात होते. प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या ‘The Dramatic Decade- The Indira Gandhi Years’ या ग्रंथात याबद्दल खूप विस्तृत वर्णन केले आहे.

इंदिरा गांधी यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करताना ही बाब आवर्जून दुर्लक्ष केली जाते की, प्रत्येक वेळी मूळ कॉंग्रेस म्हणून ओळखल्या जाणा-या कॉग्रेससोबत संघर्ष करत त्यांनी स्वतंत्र यश मिळवलेले आहे. नेहरू १९५४ ला अध्यक्ष झाल्यानंतर हे पद १९५५ पासून १९५९ पर्यंत यु.एन.ढेबर यांच्याकडे होते, त्यानंतर १९६०, १९६१ आणि १९६३ नीलम संजीव रेड्डी हे अध्यक्ष होते तर १९६४ पासून १९६७ पर्यंत के.कामराज अध्यक्ष होते.  हे सर्वच नेते इंदिराजींचे विरोधक होते ! पुन्हा १९६८ आणि १९६९ रेड्डी हेच अध्यक्ष होते. या काळात कॉंग्रेस वर दक्षिणात्य नेत्यांचा वरचष्मा होता आणि हे सर्व इंदिरा गांधींचे विरोधक होते. माजी केंद्रीय मंत्री के.नटवर सिंग यांनी त्यांच्या ‘ One life is not enough’ पुस्तकात लिहिले आहे की, ‘From 1966 to 1969- Indira Gandhi was in office but not in power. The actual power rested in the hands of Syndicate- S.Nijlingappa, Atulya Ghosh, K.Kamraj, Morarji Deasi and S.K. Patil’  म्हणजे पंतप्रधान असूनही त्या पक्षात नेहरूंप्रमाणेच कमजोरच होत्या!

उत्तर भारतात कॉंग्रेसची अवस्था अतिशय बिकट होती, म्हणून कॉंग्रेसला उत्तर भारतीय नेता हवा होता , जो केवळ बाहुला (Puppet) म्हणून काम पाहू शकेल. इंदिरा गांधी यांचा 'गुंगी गुडिया' हा उल्लेख याच वेळेचा आहे. म्हणजे नेहरू या नावाचे   'गुडवील' वा 'ब्रँड' वापरून त्यांना सत्ता मिळवायची होती परंतु अंकुश मात्र स्वत:चा ठेवायचा होता. वास्तविक इंदिरा गांधी स्वातंत्र्यपुर्व काळापासून कॉग्रेस मधे कार्यरत होत्या आणि भारत छोडो आंदोलनात त्यांनी कारावासही भोगला होता. त्यांचे हे वैयक्तिक योगदान होते. हे पाहता खरेतर या इंदिरा विरोधकांना नेहरू-गांधी परीवारावर घराणेशाहीचा आरोप करण्याचा नैतिक अधिकारच नाही! कारण स्वहित पाहताना इंदिराजीचे स्वतंत्र अस्तित्व त्यांना मान्यच नव्हते!

इंदिरा गांधी १९६७ ला झालेल्या निवडणुकी नंतर पुन्हा पंतप्रधान झाल्या , तेंव्हा कॉंग्रेसच्या २८४ खासदारांपैकी त्यांना केवळ २११ खासदारांचा पाठींबा होता, डाव्या पक्षातील खासदारांच्या पाठींब्यावर त्यांचे सरकार उभे होते. पुढच्या तीन वर्षात पक्षातील प्रभावशाली नेत्यांनी अडचणी निर्माण केल्यावर त्यांनी २७ डिसेंबर १९७० रोजी लोकसभा विसर्जित करून पुन्हा जनतेसमोर जाण्याचे ठरवले. मूळ कॉंग्रेस पक्षाचे 'बैल-जोडी' चिन्ह त्यांना मिळाले नाही कारण ते संघटना कॉग्रेसने स्वत:कडे ठेवले होते. इंदिरा गांधींनी मुळ कॉग्रेसचा त्याग करत कॉग्रेस (जगजीवनराम) या पक्षासाठी 'गाय वासरू' हे चिन्ह घेवून निवडणूक लढवली आणि ३५० जागांसह जिंकली. इंदिरा-जगजीवनराम कॉंग्रेसने संघटना कॉंग्रेसला पराभूत केले होते. अतिशय अल्पकाळातच त्यांनी स्वतःचा वेगळा असा ठसा आणि वेगळी ओळख निर्माण केली ,जी जवाहरलाल नेहरूंच्या कन्या या पेक्षा पुर्णत: स्वतंत्र आणि वेगळी अशी निर्माण झाली  होती!

इंदिरा गांधी यांनी स्वतःचा स्वतंत्र असा प्रभाव निर्माण केला होता, इथेच खरेतर घराणेशाही हा मुद्दाच इथे नष्ट झाला होता! गमतीचा भाग असा की,इंदिरा गांधी नेहरूंच्या कन्या म्हणून जेंव्हा प्रचारादरम्यान त्यांचा उल्लेख इंदिरा नेहरू असा कोणी केला तर त्यावर विरोधकांकडून टीका केली जायची की, विवाहानंतर नाव बदलते मग इंदिराजींनी नेहरू हे नाव का  लावावे? अगदी हाच प्रत्यय प्रियांका गांधी म्हटल्यावर हल्ली फेसबुकवरही येतो ! वास्तवात कॉंग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेंव्हा, पक्षातील नेतेच पुन्हा पक्षाला गांधी-नेहरू घराण्याचा आश्रयाला घेवून गेलेले आहेत!  जवाहरलाल नेहरू १९५४ मध्ये अध्यक्ष होते ,त्यानंतर हे पद इंदिरा गांधी यांना तब्बल २४ वर्षांनी १९७८ साली मिळाले हे विशेष !

'बैलजोडी' सोडून मिळवलेले 'गायवासरू' हे चिन्हही पुन्हा त्यांना सोडावे लागले आणि इंदिरा कॉंग्रेस स्थापन झाल्यावर 'हात' या  चिन्हांसह  त्यांनी पुन्हा विजय मिळवला! यावरून इंदिरा गांधींची राजकीय नेता म्हणून ओळख आणि लोक स्वीकृती हे स्वतंत्र होती, हेच स्पष्ट होते. प्रत्येक वेळी  स्वतःच्या नवीन पक्षाच्या नवीन चिन्हावर निवडणुका जिंकून आल्यावर पुन्हा मुळ कॉंग्रेसचे म्हणवणारे नेते इंदिराजीकडे गेले आहेत, या खूप मोठा अर्थ लपलेला आहे!

इंदिराजीकडे जे लोक  केवळ नेहरूंची मुलगी म्हणून पाहतात. कारण त्यांना घराणेशाहीचा आरोप नेहरूंवर करायचा असतो. तर कांही प्रखर लोकशाहीवादी जवाहरलाल नेहरूंच्या विचारांना तिलांजल्या देणा-या वृत्तीच्या नेत्या म्हणूनही पाहतात आणि पुन्हा घराणेशाहीचा आरोपही करतात. आपल्या वडिलांनी कॉग्रेससाठी कार्य केले देशासाठी कारावास भोगला म्हणून नेहरूंच्या त्याच  कर्तृत्वावर त्या स्वार झाल्या, असं म्हणणा-या अनेकांना हे माहीत नसते की त्यांनी स्वतंत्रपणे अडीच वर्ष कारावास भोगला आहे. नेहरू स्वातंत्र्यसंग्रमात वयाच्या २७  व्या वर्षी आले मात्र इंदिराजींचा सहभाग हा वयाच्या १३  व्या वर्षापासून आहे. त्यांचं बालपण देखील स्वातंत्र्यसंग्रमात होरपळून निघालेले आहे . नेहरूंनी आयुष्याच्या सुरवातीचा एक कालखंड तरी सुखात काढला,  पण इंदिरेने बालवयातही पारतंत्र्याच्या झळा सोसल्यात. हजारो भारतीयांचे कल्य़ाण पाहणा-या बापाचा सहवास एक बाप म्हणून त्यांना कधीच मिळाला नाही. विशेष म्हणजे नेहरूंच्या हयातीत इंदिराजी ना राज्यसभेच्य़ा सदस्य होत्या ना लोकसभेच्या! त्यातूनच विलक्षण असे धाडसी व्यक्तीमत्व तयार झाले आहे. ज्याचा ठसा त्यांनी भारतीय अथवा भारतीय उपखंड नव्हेतर जगाच्या राजकारणावर निडरपणे उमटवलेला आहे.

इंदिराजींनी आणीबाणी  लागू करताना त्याची पार्श्वभुमीही पहायला हवी. ती न पाहता अनेकजण टिका करतात. तीची उद्दिष्टे चांगली होती मात्र तीची अंमलबजावणी करताना अनेक चुका झाल्या. त्याचा परीणाम त्यांना भोगावा लागला. आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर करण्यापुर्वी त्या त्यांचे अध्यात्मिक गुरू जे. कृष्णमुर्तींना भेटल्या त्यावेळी त्यांनी ' You are for the people and from the people, so go to the people again' असा सल्ला दिला अशी माहीती महेश भट्ट यांच्याकडून मिळाली. इंदिराजी त्यावेळी पराभूत झाल्या पण जनतेने पुन्हा त्यांना सत्तेवर आणले. कारण देश त्यांच्याच हाती सुरक्षित असेल अशी जनतेची प्रबळ धारणा होती हेच पुन्हा स्पष्ट झाले.

आज इंदिराजींना आपल्यातून जावून ३४ वर्ष झाली. पण आजही इंदिराजींबद्दलची  लोकांच्या मनातील भावना तशीच आहे. इंदिराजींनी भारतातील नव्हेतर, भारतीय उपखंडांतील महिलांना राजकारणाची व नेतृत्वाची प्रेरणा दिली. श्रीलंकेत बंदारनायके यांच्या रूपात सर्वप्रथम महिला नेतृत्व पुढे आले असले तरीही संघर्षाची प्रेरणा ही इंदिराजींचीच आहे, हे अगदी बेनझीर भुत्तो,  शेख हसीना यांनीही त्यांच्या लेखनात मान्य केले आहे. एवढंच काय तर आजही, नळावरील भांडणात एखादी स्त्री पुढारपण करू लागली की, अगदी भांडतानाही महिला म्हणतात ' हो आलीय मोठी इंद्रा गांधी '! जनसामान्य महिलांच्या मनात नेतृत्व म्हणजे इंदिरा गांधी हा मापदंड आजही पक्का आहे! 

इंदिराजीनंतर भारताने अनेक उलथापालथ अनुभवली आहे. पण  आताचा कालखंड तर खूपच बिकट असा आहे, कारण लोकशाही मार्गाने निवडले गेलेले सरकार लोकशाहीचा अर्थ 'बहुसंख्यकांची हुकूमशाही'स असा गृहीत धरून लोकशाहीच्या मुळ संकल्पनेस उध्वस्त करू पाहतंय. तेंव्हा आपल्या प्रत्येकात असणा-या इंदिराजींना पुन्हा जागृत करायचे आहे. जनसामान्य लोकांच्या मनात ते स्फुलिंग आहेच  फक्त आपण त्याची मशाल बनवणे गरजेचे आहे.

इंदिराजींच्या ३४ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आणि त्यांच्या उत्तुंग कार्यास विनम्र अभिवादन.

© राज कुलकर्णी.


गडचिरोली :
दरवर्षी रब्बी आणि खरीप हंगामात धान खरेदी होत असते. यावेळी आविका संस्थांच्या वतीने धान खरेदी होत नव्हती. आधीच दुष्काळामुळे उत्पादन कमी होते. त्यातही आहे त्याची खरेदी होत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी तक्रार करताच जिल्ह्यातील ४३ धान खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता शेताक्रीराजाच्या डोक्यावरचा भर हलका झाला आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. 


कोरची तालुका :- कोरची, रामगड, पुराडा, मालेवाडा, येंगलखेडा, खेडेगाव.
कुरखेडा तालुका :- कुरखेडा, आंधळी, खरकाडा, गेवर्धा, नान्ही, देऊळगाव, गोठणगाव, सोनसरी, पलसगड.
आरमोरी तालुका :- अंगारा, उराडी, देलनवाडी, दवंडी, पुरंडी माल, देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव,.
गडचिरोली तालुका :- मौशिखांब, पोटेगाव, धानोरा तालुक्यातील रांगी, मुरूमगाव, धानोरा, दुधमाळा, कारवाफा.
चामोर्शी तालुका :- घोट, मक्केपल्ली, रेगडी, आमगाव, अड्याळ, सोनापूर, गुंडापल्ली, भाडभिडी, गिलगाव, मार्र्कंडा या केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.
दुर्गम भागातील अडचणी समजून घेत इतरही ५ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. आता या केंद्रावर लवकरच धान खरेदी सुरु होणार आहे. धान खरेदी केंद्र सुरु झाल्यामुळे शेतकरी सुखावला आहे.


मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांची सभा भंडारामधील येरली येथे फार्म हाऊसवर झाली. त्यावेळी मुख्याध्यापकांनी छोटे प्रश्न मार्गी लावण्यासाठी काम करायला हवे. शाळेच्या सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी झटून प्रयत्न करायला पाहिजे. असे पदाधिकाऱ्यांना राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडीकर सुचवले. तसेच संगठन मजबूत करत लोकाभिमुख होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी सातव्या वेतन आयोगात ५४०० ग्रेड पे देण्याचा प्रस्ताव बक्षी समितीला देण्यात आला.

राज्याचे सरकार दिशाहीन झाले आहे असे म्हणत खेडीकर यांनी राज्य सरकारवर टीका केली. तर मुख्याध्यापकांना निवड श्रेणी बाबतही शासन सकारात्मक आहे असे विधान विदर्भ साची सतीश जगताप यांनी केले.
दिवसेंदिवस मराठी शाळांबाबतीत नियम बदलत आहेत. राज्य शासन मनासारखी धोरणे राबवत आहे. त्यामुळे मागे शिक्षकांनी आंदोलन केले होते. ग्रामीण भागात तर ऑनलाईन संकल्पनेचा वापरामुळे शिक्षकांचा बहुतेक वेळ नेटवर्क शोधण्यात जायचा.त्यामुळे या सरकारच्या धोरणाबाबत शिक्षकही खुश नाहीत असे चित्र ग्रामीण भागात दिसून आले.


अकोले :
दर आठवड्याला कुठल्या न कुठल्या पिकाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरीराजाची दिवाळी गोड होणार आहे. मागील आठवड्यात कांदा, त्यानंतर दसऱ्याला झेंडू, गेल्या दोन दिवसात भाज्यांचा भाव चढत्या क्रमात आहे. त्यातच आता कापसाला हमीभावापेक्षा ४०० ते ५०० रुपये वाढून मिळाल्यामुळे शेतकरीराजा चांगलाच सुखावला आहे.

कापसाचे भाव सहा हजार रुपयांवर पोहोचले आहेत. दररोज देशात तब्बल ३५ हजार क्विंटल आवक सुरु आहे. आखूड धाग्याच्या कापसाला ५००० ते ५२०० तर लांब धाग्याच्या कापसाला ५५०० पर्यंत हमीभाव मिळत आहे. अकोट व खामगाव बाजारपेठेत हे दर प्रतिक्विंटल साडेपाच हजारांपेक्षा जास्त होते. दुष्काळ असतानाही काही पिकांचे उत्पादन चांगले झाले. आणि त्याच पिकांना हमीभाव चांगले मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.


अहमदनगर :
नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृश तालुक्यातील विद्यार्थ्यांना उर्वरीत शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवास सवलत पास दिला जाणार आहे असे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सद्यस्थितीत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मासिक पाससाठी ६६.६७ इतकी सवलत दिली जाते. आता हि सवलत १०० टक्के दिली जाणार आहे. याचा फायदा राज्यातील तब्बल ३५ लाख विद्यार्थ्यांना होणार आहे.
अशा दुष्काळी परिस्थितीत एसटी महामंडळाने घेतलेला निर्णय हा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुखद आहे. पण या सवलतीमुळे एसटी महामंडळावर साधारण 85 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.  तरीही अडचणीच्या काळात मदत करने हे एसटी महामंडळाचे कर्तव्य असून ते हि सवलत उर्वरित शैक्षणिक वर्षासाठी दिली जाणार आहे.
 या सवलतीमुळे दुष्काळाची झळ कमी होऊन विद्यार्थ्यांना एक प्रकारची उर्मी मिळणार आहे.

अहमदनगर :
भारतीय महाक्रांती सेनेने विविध स्तरावर अनेक माध्यमांतून काम केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याचा त्यांचा मानस आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातील कलाकरांना एकत्र आणण्यासाठी चित्रपट आघाडी सुरू केली आहे.
भारतीय चित्रपट महाक्रांती सेनेच्या जिल्ह्याध्यक्षपदी अहमदनगर येथील जगदीश रघुनाथ आंबेडकर यांची निवड करण्यात आली.

जगदीश आंबेडकर यांनी नगर जिल्ह्यातील चित्रपटातील कलाकारांसाठी व कर्मचार्यांची सतत मदत करत असतात. या त्यांच्या कामाची दखल घेत भारतीय चित्रपट महाक्रांती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश सकुंडे यांनी त्यांना जिल्हाध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निवडीचे स्वागत केले आहे. आंबेडकर यांनी पुढील कामकाजावर जास्त भर देण्याचे व कलाकारांच्या सेवेसाठी कधीही उपलब्ध राहाण्याचे आश्वासन नियुक्तीनंतर दिले आहे.

जंगलातली अवस्था

पाण्याच्या शोधात जंगलातील एखादा प्राणी जर गावात दिसला तर हैराण होऊ नका. कारण तुमची आणि त्यांची पाण्यासाठीची अवस्था सारखीच आहे. तिथेही पिण्यासाठी पाणी नाही. आज पाण्यासाठी ते खेड्यापाड्यात शिरत आहेत. उद्या अन्नासाठी शिरतील. दुष्काळाचे सावट जसे माणसावर आहे तसेच जंगली प्राण्यांवरही आहे.

काल एक हरीण पाणी पिण्यासाठी विहिरीकडे गेले असता विहिरीत पडले. येवला तालुक्यातील राजापूर परिसरात हि घटना घडली. त्यांनतर वन अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या हरणाला बाहेर काढून सोडण्यात आले. सोडण्यापूर्वी त्याची तब्येत तपासली. आणि हरीण ठणठणीत असल्याचा निष्कर्ष समोर आला.

सध्या येवले तालुक्यातील हरीणांचे कळपच्या कळप पाण्याच्या शोधात जंगलाच्या बाहेर पडताना दिसत आहेत. तसेच आपापला परिसर सोडून ईतर गावांमध्ये शिरकाव करत आहेत.
अन्न आणि पाण्याच्या शोधात प्राणीही भटकत आहेत.
शेतकरीराजा आणि या वन्य प्राण्यांची पाणीटंचाई बाबतीत अवस्थासारखीच आहे.

अहमदनगर :
पावसाने दिलेला दगा, पाण्यावरून पेटलेले राजकारण आणि निसर्गाची सद्यस्थिती बघता पाण्याची टंचाई निर्माण होणार आहे असे दिसून येते. मागच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी पिक उत्पादन कमी झाले. यावर्षीही परिस्थिती मध्ये विशेष अस बदल नाही. पिक उत्पादन जास्त प्रमाणात घटले. त्यामुळे अगदी जनावरांना चार सुद्धा मिळेनासा झालाय. आधीच पाण्यावरून राजकारण पेटलेले आहे. त्यात चार्यावरून अजून एखादी समस्या उभा राहू नये. म्हणून आधीच दक्षता घेत नगरचे जिल्हाधिकारी राहुल द्वीवेदी यांनी एक फर्मान काढले आहे. चार्यावरून पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यात असलेला चार बाहेर जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे.

त्यात विशेष अधिकाराचा वापर करत हे आदेश दिले आहेत. जनावरांचा चारा जिल्ह्याबाहेर जाऊ नये असे निर्देश दिले आहेत. हे आदेश संबंधित सर्व शासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. आणि कसल्याही परिस्थितीत चार जिल्ह्याबाहेर जाणार नाही याची खबरदारी घ्यावी असेही सुचवले आहे.


मुंबई :
राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ट नेते छगन भुजबळ यांना 'मनुस्मृति' ला विरोध केल्यास तुमचाही दाभोळकर करु या प्रकारची जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाशिकच्या 'भूजबळ फार्म' हाऊसवर एका निनावी पत्राद्वारे हि धमकी देण्यात आली आहे.

नागपुरातल्या एका सभेमध्ये " आम्हाला बाबासाहेबांच संविधान हवे आहे मनुस्मृति नव्हे" असे म्हणत भुजबळांनी मनुस्मृतिचा निषेध केला होता. यानंतर या प्रकारची धमकी त्यांना देण्यात आली. या संदर्भात नाशिकचे राष्ट्रवादी कांग्रेसचे पदाधिकारी पोलिस आयुक्तांची भेट घेवुन तक्रार नोंदवणार असल्याचे कळले.

धमकीनंतर भुजबळ फार्मवर पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात गोळा होण्यास सुरुवात झाली आहे. तरी धमकी संदर्भात लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी अशी तीव्र मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडुन करण्यात येत आहे.

अहमदनगर :
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजला जाणार्‍या नगर तालुक्यातील वडगांव गुप्ता ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भाजपचे नेते श्यामराव पिंपळे यांच्या पत्नी सारिका पिंपळे यांची मागील एक महिन्यापूर्वी निवड झाली होती. मात्र श्यामराव पिंपळे व सारिका पिंपळे यांनी वडगांव गुप्ता येथील शासकीय जमिनीत राहत्या घराचे अतिक्रमण केले असल्याची तक्रार वडगांव गुप्ता येथील विरोधी पॅनलचे गोरक्षनाथ सातपुते व इतर ग्रामस्थांनी अ‍ॅड.एल.के. गोरे यांच्या मार्फत केली होती. याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेऊन या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट करीत सारिका पिंपळे यांचे उपसरपंच पद रद्द केले. या प्रकरणात सरपंच पदाचे विरोधी उमेदवार गणेश गीते यांनी पाठपुरावा केला होता.

श्यामराव पिंपळे व सारिका पिंपळे यांनी वडगांव गुप्ता मधील शासकीय जमिनीत राहत्या घराचे अतिक्रमण केले आहे. सदर निकाल नुकताच गुरुवार दि.25 ऑक्टोबर रोजी निकाली काढण्यात आला. या निकालाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निकालाची चर्चा संपुर्ण नगर तालुक्यात रंगली आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेल्या अजून काही सदस्यांनी वडगाव गुप्ता ग्रामपंचायतीच्या शासकीय जागेत अतिक्रमण केले आहे. त्यांचीही तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली असून, त्यावर सुनावणी होऊन निकाल राखून ठेवण्यात आला आहे. तर ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी खोटा जातीचा दाखला वापरून सरपंच पद घेतले आहे. या जातीच्या दाखल्याची तक्रार अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीकडे प्रलंबित आहे. या दोन्ही प्रकरणाचे निकाल काही दिवसांत येण्याची शक्यता असून, संपुर्ण नगर तालुक्याचे लक्ष या निकालाकडे लागून आहे.

अहमदनगर :
दिवसेंदिवस बाजारात भाजी महागत चालली आहे. कमी पावसामुळे उत्पादन कमी झाले. नियमित उत्पादनात झालेली घट बाजारावर परिणाम करणारी ठरली. त्याचाच फटका आता बाजारात जाणवू लागला आहे. वांगे, मिरची, भेंडी, वाटाण्याच्या शेंगा,काकडी आणि इतरही बऱ्याच भाज्यांचे दर वाढले आहेत. पाऊस नसतानाही ज्यांची पिके टिकली त्या शेतकऱ्यांची आता चांदी होणार आहे.

दुधी भोपळा, कारले, दोडके, वांगे, मिरची, भेंडी आदींचे भाव ४० टे ५० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर काकडी, बटाटे, टोमॅटो, कांदे आदींचे भाव १५ टे २५ या दराने चालू आहेत. थोडासा भाव वाढला तरी नेहमीप्रमाणे नागरिकांना भाववाढीची विशेष झळ बसत आहे.

दहा ते पंधरा टक्क्यांनी भाववाढ झाली असून किरकोळ मालाला सुद्धा चांगला भाव मिळत आहे.  हि भाववाढ दिवाळी संपेपर्यंत अशीच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुष्काळ असतानाही यंदा काही शेतकऱ्यांची दिवाळी गोडाची होणार आहे. भाज्यांची आवक कमी होत गेली तर भाव अजून वाढू शकतात असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.


एकाच दगडात दोन पक्षी मारायची कला सेनेला फार पूर्वीपासून अवगत आहे. आज सेनेच्या असण्यामध्ये या कलेचा मोठा वाट आहे. येत्या १६ वर्षांमध्ये मुंबई विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी १४ लाख ६० हजार कोटींची मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच योग्य ठिकाणी योग्य निधी वापरला जावा ते ठरवणारी एक समिती नेमावी अशीही मागणी यावेळी सेनेने केली आहे.

दुष्काळाच्या मुद्द्यावर भाजपाला कोंडीत पकडले आहे. राष्ट्रवादी, मनसे हे एकत्र येऊन संधी मिळेल तिथे भाजपवर हल्लबोल करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेकडून हि मागणी केली जात आहे. त्यामुळे सत्तेत असलेला पक्ष सुद्धा भाजपविरोधात कारवाया करू लागला आहे. एका बाजूला मनसे व राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह दिसत असताना भाजपा – शिवसेना एकमेकांकडे तोंड फिरवून उभा आहेत.

आता जर मागणी मंजूर झाली तर त्याचे श्रेय सेना घ्यायला मोकळी होणार आणि जर मागणी नामंजूर झाली तर सेनेला भाजपवर टीका करायला आणखी एक विषय भेटणारा आहे. सेनेने हि मागणी करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.


पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेला मुळशी , मावळ, भोर व वेल्हा नावाचे तालुके वसले आहेत.  सह्याद्रीचे कवच असलेल्या या तालुक्यांना मावळी तालुके म्हणून देखील ओळखले जाते.  याच मावळ प्रांतातील गाय व बैलांच्या जातीला मावळी नावाने ओळखले जाते.

मुळशी तालुक्याच्या आदरवाडी व निवे परिसरातील कुसळाच्या रानात असंख्य मावळी गाया व बैलांचे कळप पहायला मिळत आहेत. कुसळाच्या रुपाने सकस नैसर्गिक चारा खाणाऱ्या मावळ्या गाईंचे निरिक्षण करताना Mr & Miss मावळ स्पर्धा सुरु असल्याचा भास होतो.

शांत स्वभाव हे मावळी गाईचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सुडौल बांधा असलेली मावळी गाय शक्तिवान व चपळ असते. शरीराची नेटकी बांधणी व आकर्षक चालीमुळे पाहता क्षणी गाय नजरेत भरते.
मावळी गाईचा शरीराचा आकार मागील बाजुस रूंद आणि पु़ढे निमुळता असतो. .गाईचे डोळे चमकदार आणि मान बारीक असते. कास पोटाला व्यवस्थित घट्ट चिकटलेली असते.कासेच्या त्वचेवर शिरांचे चांगले जाळे असल्याने , कासेचे चारही कप्पे पूर्ण विकसीत  होतात.


लेखक : विशाल केदारी

मुंबई :
दिवाळी तोंडावर आली असुन दिवाळीची खरेदी ज़ोरावर आहे. अशात ऐन दिवाळीत बॅकांना चार दिवस सुट्टी रहाणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.बुधवारी ७ नोव्हेंबर लक्ष्मीपुजन तर गुरुवारी ८ नोव्हेंबरला दिवाळी पाडवा निमित्त बॅकाना सुट्टी असेल, शुक्रवारी बॅका चालु राहतील व शनिवार आणि रविवार अशा सलग दोन दिवस बॅका बंद राहतील. ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होईल.

यामुळे या काळात नागरीकांना एटीएम व इतर कॅशलेस व्यवहारांवर अवलंबुन रहावे लागेल.

अशात खेडे भागातील नागरिकांना कॅशलेस व्यवहार तितक्या प्रमाणात माहीत नसल्याने त्यांना याचा त्रास अधिक होण्याची शक्यता आहे.

मुंबई :
दिवाळीच्या तोंडावर सोन्याचा भावात वाढ झाली असुन सोनं ३२,७३५ रुपये इतक झाल आहे. गेल्या ६ वर्षातला हा सोन्याच्या भावातला उच्चांक मानला जात आहे. ‌

अमेरिका आणि चीन मधल्या ट्रेडवारमुळे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरु असल्याने भारतात सोन्याचा भाव वाढला आहे.

गेल्या तीन दिवसात सोन्याचा भाव साडे चारशे ते पाचशे रुपये इतका वाढला आहे. व ते आणखीन वाढत जाण्याची दाट शक्यता सराफांनी सांगीतली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे वाढलेले भाव ग्राहकांसाठी त्रासदायक ठरणार आहे हे नक्की.

वेस्टइंडीजचा स्टार क्रिकेटपटु क्रिस गेल सध्या मुंबईत एका जाहिरातीच्या शुटिंग साठी आलेला आहे. बुधवारी रात्री तो एका क्लब मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून डान्स करत होता. त्यामुळे मोठ्या आवाजाने त्रासलेल्या आसपासच्या लोकांनी पोलिसात तक्रार केली.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येवुन क्रिसला बाहेर काढले व चांगलेच खड़े बोल सुनावून त्याला पोलीसगाडीतुन त्याच्या हॉटेलवर सोडले. मोठ्या आवाजात गाणी लावल्याबद्दल पोलिसांनी क्लब मालकाला दंड ठोठावला. यावेळी गेलने पोलिसांच्या गाडीवर बसुन फोटो काढले व सोशल मीडिया वर अपलोड करत लिहिले की मी भारतीय कायद्याचा सन्मान करतो.

27 ऑक्टोबर महाराष्ट्राचा हवामान अंदाज: मराठवाडा आणि विदर्भाच्या बऱ्याचं भागात कमाल तापमान 35 ते 36 अंश सेल्सियस, तापमान आणखी वाढणे अपेक्षित

गेल्या 24 तासांत, कोकण-गोवा तसेच मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर तुरळक पाऊसाची नोंद झाली आहे. मुंबई शहर परिसरात देखील हलक्या सरींची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र ,विदर्भ आणि मराठवाड्यातील हवामानात कोणताही बदल झालेला नसून या भागांमध्ये अजूनही कोरडे हवामान अनुभवण्यात येत आहे.

तथापि एक ट्रफ रेषा तमिळनाडुपासून उत्तर महाराष्ट्रा पर्यंत विस्तारलेली असल्यामुळे कोकण-गोवा तसेच आसपासच्या दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर थोडा काळ पाऊस होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे , किनारी भागात उबदार आणि आर्द्र वारे अनुभवण्यात येत असून दिवसाचे तापमान 35 ते 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे व किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवले जात आहे.

त्याचप्रमाणे, मुंबईकर देखील उकाडा सहन करत असून, तापमान 37 अंशापर्यंत पोहोचले आहे. दरम्यान येणाऱ्या दिवसात वातावरणात बदल नसून तापमान आणखी वाढणे अपेक्षित आहे.

आता महाराष्ट्रातील प्रमुख शहरांच्या तापमानावर नजर टाकूया:

मुंबईत अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 38 अंश से. आणि किमान 21 अंश से. असण्याची शक्यता आहे.

नाशिक मध्ये अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान 15 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.

पुणे येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश राहण्याची अपेक्षा आहे.

वर्धा येथे अंशतः ढगाळ आकाशासह कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 18 अंश सेल्सिअसच्या जवळपास असेल.

अकोला येथे अंशतः ढगाळ आकाशासह दिवसा तापमान 36 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 18 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.

नागपूर येथे दिवसा तापमान सुमारे 34 अंश सेल्सिअस आणि रात्री तापमान 16 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

- See more at: https://www.skymetweather.com/content/national-video/maharashtra-weather-forecast-for-oct-27-temperatures-soaring-up-in-maharashtra-no-rains-expected/#sthash.Odbeeg3N.dpuf

अहमदनगर :
जिल्ह्यात पाऊस कमी झाल्याने टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गावनिहाय आढावा घेऊन या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याचा समावेश करुन परिपूर्ण टंचाई आराखडा तयार करा, असे निर्देश राज्याचे मृद व जलसंधारण, राजशिष्टा्चार, विमुक्त जाती, भटक्या  जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री  तथा पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांनी दिले.

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री प्रा. शिंदे विविध गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.  आज त्यांनी नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी आणि पांगरमल गावांना भेटी देऊन तेथील पीकपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे अधिकारी-पदाधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जि.प.चे मुखय कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार अप्पासाहेब शिंदे आदींसह पदाधिकारी, विविध यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाईसदृश तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुक्यातील गावात सर्व प्रकारच्या आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्याची गरज आहे. त्यासाठीचे नियोजन विविध विभागांनी तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बुडकी खोदणे, विहिरी खोल करणे व गाळ काढणे, खाजगी विहीर अधीग्रहण, टैंकर्स-बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा, प्रगतीपथावरील नळपाणीपुरवठा योजना पूर्ण करणे, नळयोजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी घेणे आणि तात्पुरत्या पूरक नळ योजना घेणे आदी उपाययोजना या  टंचाईसदृश परिस्थितीमध्ये घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाहणी करुन आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

 पालकमंत्री प्रा.शिंदे यांनी, राज्य शासनाने टंचाईसदृश तालुक्यात जाहीर केलेल्या उपाययोजना आणि सवलतींच्या अंमलबजावणी संदर्भात संबंधितांना यावेळी सूचना केल्या. आगामी काळात पाणी आणि चारा यांचे नियोजन करुन त्याची उपलब्धता कशी होईल हे पाहा. मागेल त्याला काम याप्रमाणे रोहयोच्या कामांचे शेल्फ तयार करा, असे निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. 

सध्याच्या परिस्थितीत एकत्रित आणि समन्वयाने काम करण्याची गरज आहे. पाझर तलावातील गाळ काढणे,  वनतळी, सीसीटी, रोपवाटिका निर्मिती, चारा नियोजन, पशुधनाची काळजी आदी बाबींकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे पालकमंत्री प्रा. शिंदे यांऩी सांगितले. 

नगर तालुक्यातील गावांना भेटी दिल्यानंतर आणि आढावा घेतल्यानंतर पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील तिसगाव शिवारातील पिकांची  पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

अहमदनगर :
तालुक्यातील निमगाव वाघा येथील प्रसिध्द बिरोबा देवस्थान येथे होईकचा धार्मिक कार्यक्रम नुकताच पार पडला. देवाचे भगत नामदेव भुसारे यांनी होईक (भविष्यवाणी) सांगताना पुढील वर्षी येणार्‍या संकटाचे स्पष्टीकरण दिल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. तर पुढील वर्षीसाठी शेतीचे भाकित चांगले वर्तविल्याने शेतकर्‍यांनी सुटकेचा निश्‍वास सोडला. लक्ष्मीला पिडा असल्याची भविष्यवाणी त्यांनी केली. भविष्यवाणी ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

अंगावर वेताचे फटके ओढून भविष्यवाणी (होईक) सांगताना भगत भुसारे म्हणाले की, दाही खंडामध्ये रक्ताचा पुर वाहणार म्हणजे युध्द किंवा नैसर्गिक संकट ओढवणार. लक्ष्मीला पिडा असून, बाळाला संकट नाही. पाच खंडामध्ये चित्ता सवातीचा पाऊस तर दिवाळीचा दिपान व सटीचा सटवान पाऊस होईल. जेठुडी साधन, गायी देठाला लागून, नवीन तूप होणार असल्याची भविष्यवाणी सांगत, शेतकर्‍यांना पुढच्या जेठुडीला चांगले दिवस येण्याचे भाकित त्यांनी वर्तविले. तसेच आषाढी साधन मध्ये पाऊस होऊन ज्वारी, बाजरी, गहू, हरबरा यांची पेर होणार असल्याचे सांगितले.

भुसारे यांनी मागील वर्षी सांगितलेले भाकित यावर्षी खरे ठरल्याने भविष्यवाणी ऐकण्यासाठी निमगांव वाघा, चास, पिंपळगाव वाघा, जखनगांव, हिंगणगाव, नेप्ती, हिवरे बाजार, निंबळक, इसळक, खारेकर्जुने आदि पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती. गावातील भविष्यवाणी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पै.नाना डोंगरे, ह.भ.प. बबन महाराज जाधव, बाबा जाधव, अनिल डोंगरे, गोकुळ जाधव, कचरु कापसे, अंशाबापू शिंदे, बाबा पुंड, बबन कापसे, नामदेव जाधव, मल्हारी शिंदे, संजय डोंगरे, रावसाहेब भुसारे, बशीर शेख, रामदास वाखारे, बाळासाहेब भुसारे, एकनाथ भुसारे, शिवाजी पुंड, बाबा चारुडे, राजेंद्र भुसारे, मयुर काळे, ज्ञानदेव फलके, भानुदास ठोकळ, ठकाराम शिंदे, युवराज भुसारे, भागचंद जाधव, नवनाथ जाधव, अंबादास निकम, सुरेश जाधव आदिंनी परिश्रम घेतले.

गुगळे यांच्या पर्यावरणपुरक बायोगॅस प्रकल्पाची देशपातळीवर नोंद
अहमदनगर :
शहरातील प्रभाग क्र.30 मध्ये वास्तव्यास असलेले भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक सतीश गुगळे यांनी बांधलेल्या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक बांबू हाऊसमधील आगळ्यावेगळ्या बायोगॅस सयंत्राची नुकतीच देशपातळीवर नोंद झाली आहे.

नगरचे प्रयोगशील आर्किटेक्ट राजेंद्र कावरे यांच्या दीर्घ अभ्यास व मार्गदर्शनातून या प्रकल्पाची नोंद व सादरीकरण पेटंट कार्यालयास केले होते. प्रायोगिक तत्त्वावर उभारलेल्या इको-फ्रेंडली सेफ्टी टँक व बायोगॅस निर्मिती या इंधन बचत करणार्‍या प्रयोग प्रकल्पाला नुकतेच भारत सरकारचे पेटंट प्रमाणपत्र मिळाले. सन 2012 साली सुरू झालेल्या या प्रकल्पामुळे ओल्या कचर्‍यापासून जागेवरच इंधन निर्मिती केली जाते. मागील सहा वर्षात जवळपास 22 टन ओल्या कचर्‍यावर प्रक्रिया करून सहजपणे 3600 तास चालणार्‍या घरगुती गॅसची निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पामुळे घरगुती इंधनाच्या एलपीजी गॅस वापरावर 40 टक्के पर्यंत बचत होऊ शकते. त्याचबरोबर गावातील व परिसरातील नागरिकांद्वारे इतरत्र बाहेर टाकला जाणारा ओला कचरा म्हणजेच घरातील उर्वरित शिळे अन्नपदार्थ, भाज्यांचे उर्वरित अवशेष, फळे व फळांच्या साली, मानवी टाकाऊ पदार्थ या सर्वांचे विघटन करून मिथेन गॅसची निर्मिती करणे शक्य झाले. ओल्या कचर्‍यामुळे होणारे प्रदूषण, दुर्गंधी, रोगराई कमी करण्यास सदर प्रकल्पामुळे निश्‍चितच मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून भारत सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचा खरा उद्देश यशस्वी होताना दिसतो. म्हणूनच केंद्र व राज्य सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण समितीने देखील या प्रकल्पाची पाहणी करून सतीश गुगळे व राजेंद्र कावरे यांचे कौतुक केले होते. गुगळे यांच्या या इको फ्रेंडली बायोगॅसमुळे अहमदनगर शहराची नोंद देश पातळीवर झाली आहे. या प्रकल्पाच्या यशाबद्दल सतीश गुगळे व राजेंद्र कावरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या प्रभागाचे नगरसेवक गणेश भोसले व माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी या प्रकल्पाच्या उभारणीसाठी मोलाची साथ दिली.

अहमदनगर :
जिल्ह्याच्या टंचाई दौर्‍यावर असलेले पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांची शेवगाव येथे गाडी अडवून शेवगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्याचे, शेतकर्‍यांना बोंड अळीची नुकसान भरपाई मिळण्याची तसेच हातगावसह 28 गावे प्रादेशिक नळ योजना कार्यान्वीत करण्याची मागणी करण्यात आली. 

जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांच्यासह शेतकर्‍यांनी सदर मागणीचे निवेदन पालकमंत्री शिंदे यांना दिले. यावेळी जगन्नाथ गावडे, संजय अंधाळे, नामदेव कसाळ, जगन्नाथ गरड, दत्तू जाधव, पांडुरंग जाधव, अक्षय गरड, गौतम सुरवसे, किसनराव पोकळे, जिजाबाई जाधव, छाया त्रिंबके, मंदाबाई लोहकरे, नवनाथ पोपळे, अंतरवाली बुद्रुक, सविता आठरे, प्रयागा पवार, इंदुबाई आठरे, गुणाजी कापसे, रामकिसन सांगळे, मनोहर झिरपे, शिवराम लोहकरे, नामदेव ढाकणे, अ‍ॅड.संजयराव काकडे, सुरेश चौधरी, विजय वंजारी, बाळासाहेब जाधव, कुमार फसले, देवराव दारकुंडे, रामकिसन सांगळे, लक्ष्मण राठोड, गुणाजी कापसे, गौतम सुरवसे, अर्जुन जाधव, हरीभाऊ फाटे, अशोक पातकळ, एकनाथ ढाकणे, आनिता जाधव, सविता आठरे, छाया त्रिंबके आदींसह शेवगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेवगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर झाला आहे. शेतकर्‍यांना दुष्काळी परिस्थितीत आधार देण्यासाठी  शासनाने शेतकर्‍यांच्या दावनीला चारा व पिण्याच्या पाण्याची सोय करावी. मागील वर्षी कपाशी या पिकावर बोंड अळी या रोगांच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे कपाशीचे पिंक संपुष्टात आले. शासनाने त्या मोबदल्यात नुकसान भरपाईपोटी प्रति हेक्टरी 6800 रु अनुदान दिले. परंतु शेवगाव तालुक्यातील गोळेगाव, गायकवाड जळगाव, नगलवाडी, अंतरवाली खुर्द, सुकळी, शेकटे खुर्द आदी इतर गावांना हे अनुदान प्राप्त झाले नाही. ते अनुदान आठ दिवसाच्या आत शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी. चालू वर्षी भरलेला पिक विमा व दुष्काळजन्य परिस्थिती पाहता शेतकर्‍यांना वाचवण्यासाठी पीक विम्याचा निकष न लावता त्यांना पंचनामे करुन सरसकट प्रति हेक्टरी 30,000 रुपये नुकसान भरपाई द्यावी. हातगावसह 28 गावे पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर केली आहे. दुष्काळी भागातील लोकांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न सोडविण्यासाठी सदर अपुर्ण अवस्थेत असलेली ही योजना कार्यान्वीत करण्याची मागणी करण्यात आली आहे. सदर प्रश्‍न मार्गी न लावल्यास शेतकर्‍यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. 

अहमदनगर :
बचत गटातील महिलांनी परस्पर समन्वय, संवादकौशल्य आणि विपणनाची (मार्केंटींग) कौशल्ये आत्मसात करण्याची गरज असून त्याद्वारे नेतृत्वगुण विकसित करावेत, असे प्रतिपादन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी व्यक्त केले.

नाबार्ड आणि महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत असणाऱ्या कर्तृत्ववान लोकसंचलित साधन केंद्राच्या वतीने महिला बचत गटाच्या अध्यक्ष आणि सचिव यांच्यासाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. नाबार्डचे जिल्हा उपमहाव्यवस्थापक एस.बी. जगताप, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड, अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी श्री. परदेशी, प्र. जिल्हा माहिती अधिकारी दीपक चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती.

श्री. गायकवाड म्हणाले, महिला बचत गटाची चळवळ ही खूप महत्वपूर्ण आहे. विकासाच्या प्रक्रियेत महिलांचे बरोबरीचे स्थान आहे. मात्र, स्पर्धात्मक वातावरणात प्रशिक्षण ही महत्वाची गोष्ट असते. परस्परसंवाद आणि विचारांचे आदानप्रदान महिलांनी केले पाहिजे. जे जे चांगले ते स्वीकारले पाहिजे. बाजारपेठेची गरज ओळखून व्यवसाय निवडला पाहिजे. केवळ स्वताची प्रगती पुरेशी नसून बचत गटाचे नेतृत्व करणाऱ्या महिलांनी सहकारी महिलांनाही सोबत घेतले पाहिजे. एकत्रित प्रयत्नातूनच गटाचा आणि पर्यायाने गटातील महिला व कुटुंबांचा विकास शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

श्री. परदेशी यांनी व्यवसायात धाडस आवश्यक असल्याचे सांगितले. कोणताही व्यवसाय करताना अपयश येईल, असा विचार करु नका. अपयश हे काहीतरी शिकवून जाते. त्यामुळे महिलांनी आत्मविश्वासाने त्यांना हव्या त्या व्यवसायात जरुर उतरावे. बाजारपेठेची माहिती करुन घ्यावी. बॅंका आणि माविम, नाबार्ड हे मदतीसाठी तत्पर असल्याचे ते म्हणाले.

नाबार्डच्या माध्यमातून महिला स्वयंसहायता बचत गटांना अधिक स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आणि बॅंकांमाप्ऱत अर्थसाह्य देण्यात येत आहे. महिलांनी याचा लाभ घेतला पाहिजे. एक महिला उभी राहिली की, घर उभे राहते, तसेच बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाचा आर्थिक आधार बळकट होतो, असे श्री. जगताप यांनी सांगितले.

श्री. चव्हाण यांनी बचत गटांच्या उत्पादित वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवित असल्याचे सांगितले. मात्र, स्पर्धात्मक वातावरणात चांगली सेवा देणारेच बचत गट टिकतील. त्यासाठी अद्यावत माहिती, नवे ज्ञान या गटांच्या महिलांनी आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले.

माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी श्री. गायकवाड यांनी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनाचा हेतू स्पष्ट केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहायक समन्वय अधिकारी सुनील पैठणे यांनी केले तर आभार व्यवस्थापक शामल कोचेवाड आणि समन्वयक सीमा काळपुंड यांनी मानले. 

अहमदनगर :
लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरणार्‍या प्रत्येक उमेदवाराकडून सार्वजनिक जागा बळकावली नसल्यावे व अतिक्रमण केले नसल्याचे शपथपत्र घेण्याची तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवाराला निवडणुकीपासून वंचित ठेवण्याची मागणी पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदने भारतीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयुक्तांना निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

सार्वत्रिक निवडणुकामध्ये शासकीय जमिनी बळकावलेले व अतिक्रमण केलेले धनदांडगे उमेदवार उभे राहत असतात. तर निवडून आल्यावर सत्तेचा गैरफायदा घेत सार्वजनिक जमीनी बळकाविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. त्यांच्यावर निर्बंध आनण्यासाठी सदर मागणी करण्यात आली आहे. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत जिल्हाधिकार्‍यांकडून तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याकडून उमेदवाराने व त्याच्या कुटुंबीयांनी कोणतेही अतिक्रमण केले नसल्याचे प्रमाणपत्र उमेदवाराला सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच गंभीर स्वरूपाचे सात वर्षापर्यंत जास्त शिक्षा होऊ शकणार्‍या गुन्ह्यातील उमेदवारास निवडणूक लढवता येऊ नये.तर निवडून आलेल्या उमेदवारावर असे गुन्हे दाखल झाल्यास त्याचे मासिक भत्ते व पेन्शनवर निर्बंध आनण्याची आग्रही मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी कॉ. बाबा आरगडे, अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा आदी प्रयत्नशील आहे.

अहमदनगर :
या वर्षीही पावसाने हुलकावणी दिल्यामुळे सर्वत्र पाणीटंचाई होणार असे चित्र दिसत आहे. नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रस्ताव दिल्यास त्वरित पाण्याचे टँकरची सोय केली जाईल अशी माहिती काल पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.

गोदावरी खोरे विकास महामंडळाने मुळा नदीतील पाणी मराठवाड्याला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मा.आमदार शंकरराव गडाख हे काल शेकडो शेतकर्यांच्या साथीने मुळा धरणावर गेले. पण नदीपासुन 2 किलोमीटर अंतरावरच पोलिसांनी शेतकर्यांची वाहने अडवली. त्याचवेळी पाऊसही सुरू झाला. अशा परिस्थितीतही शेतकरी पुढे गेलेच.
नदीत उतरत ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

मुळा धरणात आधीच कमी पाणी आहे.त्यातही 2 टीएमसी पाणी मराठवाड्याला गेले तर अवघ्या दोन महिन्यांत पाण्याचा प्रश्न निर्माण होईन. आधीच्या हंगामातही कमी पावसामुळे पिके जळाली.आणि आताही पाणी नाही मिळाले तर पिके जळतील व शेतकर्यांचे मोठे नुकसान होईल.

पोलिसांनी अडवल्यामुळे गडाखांचा पारा चढला. पोलिस दडपशाही करत आहेत.जर एकाही शेतकर्याला काठी लागली तर मुळा धरणात उतरून जलसमाधी घेईन असा दम गडाखांनी भरला. तसेच हा निर्णय राजकीय आहे असेही त्यांचे म्हणने आहे.

अहमदनगर : 
नाशिक  व पालखेड पाटबंधारे विभागातून  दिनांक 26 ते 31 ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत दारणा, गंगापूर, पालखेड धरण समुहातील धरणातून 3.24 अघफु. पाणी जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्‍यात येणार आहे.

गोदावरी  नदीवरील नांदूर मधमेश्‍वर  बंधारा ते प्रवरा संगम दरम्‍यान असलेल्‍या सर्व कोल्‍हापूर पध्‍दतीचे बंधा-यांतील फळया काढुन घ्‍याव्‍यात. प्रवाहास अडथळा निर्माण होऊ नये  यासाठी कोल्‍हापूर पध्‍दतीचे बंधा-यात फळया टाकू नयेत. अन्‍यथा संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल. दारणा, गोदावरी कादवा या नद्यांमध्‍ये पाणी प्रवाहीत असतांना सर्व ठिकाणचे गेजेस नोंदविण्‍यात येणार आहेत. जायकवाडी धरणात सोडलेले पाणी सुरळीपणे प्रवाहीत होण्‍यासाठी  सर्व लोकप्रतिनिधी, सरकारी , निमसरकारी यंत्रणा व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. 

दारणा, गोदावरी कादवा नदी काठच्‍या नागरिकांना कळविण्‍यात येते  या नद्यांमध्‍ये सेाडलेल्‍या पाण्‍याचे प्रवाहास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्‍य करु नये तसेच पाण्‍याचा अधिकृत व अनाधिकृत वापर केल्‍याचे निदर्शनास आल्‍यास महाराष्‍ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 व कलम 93,94,95,96,97  नुसार व इतर संबंधीत कलमान्‍वये कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल.

दारणा व गोदावरी कादवा नदीतून 6 हजार ते 8 हजार  क्‍युसेक्‍स  या वेगाने पाणी प्रवाहित होणार असल्‍याने नदीतील पाणी उपसा करण्‍यासाठी बसविलेली इंजिन, मोटार व इतर सर्वप्रकारचे चीज, वस्‍तू, साहित्‍य, तात्‍काळ सुरक्षित ठिकाणी हलविण्‍यात यावे.  प्रवाहामुळे  या साहित्‍याचे नुकसान झाल्‍यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही.

दारणा व गोदावरी कादवा विसर्ग जादा दराने असल्‍याने प्रवाहात उतरण्‍याचा कोणीही प्रयत्‍न करु नये  अन्‍यथा जिवितहानी होवू शकते. तमाम नागरिकांनी दक्षता घ्‍यावी. प्रवाहामुळे जीवीत,वित्‍त हानी झाल्‍यास जलसंपदा खाते जबाबदार राहणार नाही.

दारणा व गोदावरी कादवा  या नद्यांतून  वाहणा-या पाण्‍यास अडथळा निर्माण होईल असे कोणतेही कृत्‍य करु नये.  तसेच पाण्‍याचा कोणत्‍याही  प्रकारे उपसा करु नये, तसे केल्‍याचे आढळल्‍यास  अथवा करण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल. दारणा व गोदावरी कादवा  या नद्यांमध्‍ये सोडलेले पाणी विना अडथळा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात जायकवाडी धरणात पोहोचेल यासाठी सर्व नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्‍याचे जाहीर आवाहन पालखेड पाटबंधारे विभाग व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.


अहमदनगर :
पावसाने दिलेली हुलकावणीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली होती. दोनीही हंगाम पावसाविना गेले. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे.

जनावरांना खाण्यासाठी चारा कमी पडतो आहे. यावर उपाय म्हणून राज्य सरकारने वैरण, बीयाणे, खताला शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. याचा शेतकर्यांना पुरेपूर फायदा होईल. आज घडीला राज्यात जवळपास १८० तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.

यावर्षी कमी पावसामुळे प्रचंड मोठे नुकसान शेतकरी राजाला सोसावे लागले आहे.खरीप हंगामात विशेष असे उत्पादन झाले नाही. आणि रब्बी हंगामाची परिस्थिती बघता याही हंगामात मोठ्या प्रमाणात उत्पादन होणार नाही असे दिसत आहे. गावा-खेड्यांनी पिण्याच्या पाण्याची सोय नाही.या कामासाठी 10 कोटी रूपये खर्च करण्यास परवानगी मिळाली आहे. प्रती दहा गुंठे ४६० रुपये अनुदान दिले जाणार आहे. राज्यात शेतकरीराजा संकटात आहे. यावेळी मात्र राज्य सरकार त्याच्यासोबत आहेत.

मुंबई :
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांच्या बांधकामांना गती देण्यासह निश्चित केलेले उद्दिष्ट ठरविलेल्या कालावधीत पूर्ण करण्यासाठी मोठ्या वसाहतींचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing)स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आल्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी आज मंत्रालयात सांगितले.

श्री. महेता म्हणाले, या महामंडळामार्फत 2022 पर्यंत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गट आणि मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठी पाच लाख परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार असून प्रत्येक प्रकल्पात किमान पाच हजार घरकुलांचा समावेश असणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्य शासनाने 2022 पर्यंत 19 लाख 40 हजार घरांच्या बांधणीचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्यानुसार केंद्र सरकारने राज्यातील 383 शहरांमध्ये योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्याने लाभार्थ्यांना तसेच गृहप्रकल्पांना विविध सवलती दिल्या आहेत. गृहनिर्माण विभाग, म्हाडा, नगरपरिषद संचालनालय (DMA) आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत योजनेची अंमलबजावणी करण्यात येते. सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील प्रकल्पांसह संयुक्त भागीदारी (Joint Venture) धोरणांतर्गतही घरांची मोठ्या प्रमाणात उभारणी करण्यात येत आहे. मात्र, घरकुलांच्या निर्मितीस वेग देऊन निश्चित कालावधीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी म्हाडा व्यतिरिक्त पूर्णवेळ कार्यरत राहू शकणाऱ्या यंत्रणेची आवश्यकता होती. त्यानुसार महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळ (MahaHousing) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे श्री. महेता म्हणाले.

महाराष्ट्र गृहनिर्माण ‍विकास महामंडळाचा कालावधी 2022 पर्यंत अथवा प्रधानमंत्री आवास योजना सुरु असेपर्यंत राहणार असून मुख्यमंत्री हे या महामंडळाचे अध्यक्ष तर गृहनिर्माण मंत्री हे अतिरिक्त अध्यक्ष असतील. या महामंडळावर सह अध्यक्ष म्हणून अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य शासन नियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे या महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील. याशिवाय महामंडळामध्ये सर्व‍ अधिकारी-कर्मचारी हे बाह्य यंत्रणेव्दारे (Outsourcing) नियुक्त करण्यात येणार असल्याने त्याचा शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

या महामंडळासाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. राज्य शासन प्रत्यक्ष निधी देणार नसून महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA), शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित (SPPL) आणि अन्य इच्छूक शासकीय संस्था-यंत्रणांच्या समभाग गुंतवणुकीतून निधीची उभारणी करण्यात येणार आहे. तसेच खुल्या बाजारातून भांडवलाची उभारणी करण्यासह बँका आणि अन्य वित्तीय संस्थांकडून कर्जे उभारुनही निधी उभारण्यास मान्यता देण्यात आली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, अल्प उत्पन्न गटाबरोबरच मध्यम उत्पन्न गटातील लाभार्थ्यांसाठीच्या गृहप्रकल्पांना रहिवाशी क्षेत्रात 2.5 तर हरित किंवा ना-विकास क्षेत्रात एक चटई क्षेत्रफळ निर्देशांक (FSI) देण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाकडून देण्यात येणारे अनुदानही या प्रकल्पांना उपलब्ध करण्यास मान्यता देण्यात आल्याचे श्री. महेता यांनी सांगितले.

मुंबई :
वसई-विरार येथील 69 गावाच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना डिसेंबर अखेर सुरु करण्यात येणार आहे. यातील 15 गावास सध्या पाणी पुरवठा सुरु असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.

वसई-विरार व पालघर जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. यावेळी खासदार राजेंद्र गावीत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, पालघर जिल्ह्यातील केळवे माहिम व 18 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची तांत्रिक मान्यता डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. सद्यस्थितीत योजनेच्या संकल्पनाचे काम पुर्ण झाले असून सन 2018-19 च्या नवीन दरसूची नुसार अंदाजपत्रक तयार करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. पालघर जिल्ह्यातीलच उंबरपाडा, नंदाडे व 32 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची सविस्तर अंदाज पत्रके व आराखडे तयार करण्याची कार्यवाही उप विभाग, पालघर मार्फत सुरु आहे.

मुंबई :
राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री बबनराव लोणीकर व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची आज दिली.

नागपूर व भंडारा जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनांची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. लोणीकर व श्री. बावनकुळे बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल व महाराष्ट्र जीवन प्राधिकारणाचे सदस्य सचिव पी.वेलरासू व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. लोणीकर म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत सर्व पाणी पुरवठा योजनांची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्यात येणार आहेत. या योजनांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. ज्या योजनांची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रलंबित आहेत त्या तात्काळ देण्यात येतील. राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना अंतर्गत सर्व योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील.

यावेळी श्री. बावनकुळे म्हणाले, नागपूर व भंडारा जिल्ह्यातील ज्या पाणी पुरवठा योजना विद्युत पुरवठ्या अभावी बंद असतील त्या तात्काळ सुरु करण्यात येतील. तसेच राज्यातील सर्व पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर करण्याबाबतचा लवकरच कार्यवाही सुरु करण्यात येईल.

मुंबई :
यंदा राज्यात सरासरीच्या 77 टक्के पाऊस पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या निकषाप्रमाणे राज्य सरकारने ट्रिगर वन व ट्रिगर टू प्रमाणे 180 तालुके हे दुष्काळसदृष्य घोषित केले आहेत.

या तालुक्यांमधील शेतकरी, विद्यार्थी आदींसाठी आठ विविध प्रकारच्या सवलती लागू करण्यात आल्या आहेत. याचबरोबर राज्यातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणीचे काम जवळजवळ पूर्ण करण्यात आले आहे. त्या आधारावर पीक परिस्थितीचे आकलन समोर येत आहे. यानंतर लवकरच केंद्र शासनाचे पथक येऊन राज्यातील संपूर्ण परिस्थितीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक दुष्काळाशी निगडित मदत जाहीर करेल. राज्य शासनाला अधिकार दिल्याप्रमाणे केंद्राच्या निकषाप्रमाणे दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून त्याच्या उपाययोजना करण्याचे काम राज्य शासनाने सुरू केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

दुष्काळ सदृष्य तालुक्यांची यादी

अहमदनगर जिल्हा - जामखेड, कर्जत, नगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा.

अकोला जिल्हा - अकोला, बालापूर, बार्शीटाकली, मूर्तीजापूर, तेल्हारा.

अमरावती जिल्हा - अचलपूर, अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, मोर्शी, वरुड.

औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद, गंगापूर, कन्नड, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर.

बीड जिल्हा - अंबेजोगाई, आष्टी, बीड, धरुर, गेवराई, केज, माजलगाव, परळी, पातोडा, शिरुर (कासार), वाडवणी.

भंडारा जिल्हा - लाखणी, मोहाडी, पवनी.

बुलडाणा जिल्हा - खामगाव, लोणार, मलकापूर, मोताळा, नांदूरा, संग्रामपूर, शेगाव, सिंदखेड राजा.

चंद्रपूर जिल्हा - भद्रावती, ब्रम्हपूरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिंपरी, नागभिड, पोंभूर्णा, राजूरा, सिंदेवाही, वरोरा. धुळे जिल्हा - धुळे, शिरपूर, सिंदखेडे.

गोंदिया जिल्हा - देवरी,  मोरगाव अर्जूनी, सालेकसा.

हिंगोली जिल्हा - हिंगोली, कळमनुरी, सेनगाव.

जळगाव जिल्हा - अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर (एदलाबाद), पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.

जालना जिल्हा - अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.

कोल्हापूर जिल्हा - बावडा, हातकणंगले, कागल, राधानगरी.

लातूर जिल्हा - शिरुर अनंतपाल.

नागपूर जिल्हा - कळमेश्वर, काटोल, नरखेड.

नांदेड जिल्हा - देगलूर, मुखेड, उमरी.

नंदुरबार जिल्हा - नंदुरबार, नवापूर, शहादा, तळोदे.

नाशिक जिल्हा - बागलाण, चांदवड, देवला, इगतपूरी, मालेगाव, नांदगाव, नाशिक, सिन्नर.

उस्मानाबाद जिल्हा - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.

पालघर जिल्हा - पालघर, तलासरी, विक्रमगड.

परभणी जिल्हा - मनवत, पालम, परभणी, पाथरी, सेलू, सोनपेठ.

पुणे जिल्हा - आंबेगाव (घोडेगाव), बारामती, भोर, दौंड, हवेली, इंदापूर, मुळशी पौड, पुरंदर सासवड, शिरुर घोडनदी, वेल्हे.

रायगड जिल्हा - माणगाव, श्रीवर्धन, सुधागड.

रत्नागिरी जिल्हा - मंडणगड, आटपाडी, जत, कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर विटा, पलूस, तासगाव.

सातारा जिल्हा - कराड, खंडाळा, कोरेगाव, माण दहीवाडी, फलटण, वाई.

सिंधुदुर्ग – वैभववाडी.

सोलापूर जिल्हा - अक्कलकोट, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, मोहोळ, पंढरपूर, सांगोले, दक्षिण सोलापूर.

वर्धा जिल्हा - आष्टी, कारंजा, समुद्रापूर.

वाशिम जिल्हा -  रिसोड.

यवतमाळ जिल्हा - बाभूळगाव, दारव्हा, कळंब, केळापूर, महागाव, मोरेगाव, राळेगाव, उमरखेड, यवतमाळ

मुंबई :
सन 2018 च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीच्या निकषाचे ट्रीगर 2 लागू झालेल्या राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती असल्याचे आज राज्य शासनाने जाहीर केले. दुष्काळसदृष्य परिस्थितीवर उपाय योजना म्हणून या तालुक्यांमध्ये आठ विविध सवलतील लागू करण्यात आल्या असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना या उपाययोजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सन 2018 च्या खरीप हंगामामध्ये राज्यातील सर्व तालुक्यांचे महा मदत संगणक प्रणालीद्वारे दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनानुसार राज्यातील 201 तालुक्यांमध्ये ट्रिगर 1 लागू झाले होते. या तालुक्यांचे प्रभावदर्शक निर्देशांकांचे मूल्यांकन करून ट्रिगर 2 मध्ये समाविष्ट झालेल्या 180 तालुके आज जाहीर करण्यात करण्यात आले. या तालुक्यांमधील रँडम पद्धतीने 10 टक्के गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल पाठविण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्त, कृषी आयुक्त व संबंधित जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये जमीन महसुलातून सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेती निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू बिलामध्ये 33.5 टक्के सूट, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर व टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीज जोडणी खंडित न करणे आदी उपाय योजना जाहीर केल्या आहेत.

ऊसतोड कामगारांसाठी वीस कोटींची नविन योजना

राज्य सरकार ऊसतोडणी कामगारांसाठी नविन योजना अंमलात आणणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या दसरा मेळाव्यात ग्रामविकास व महिला-बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी नविन योजना जाहिर करू असे आश्वासन दिले होते. योजनेसंबंधी सर्व आराखडे व तरतूदी पूर्ण झाल्या. त्यानंतर लगेचच सदर योजना जाहिर करत पंकजा यांनी हे जनतेला दिलेले आश्वासन पाळले आहे.
सदर योजना हि 'लोकनेते गोपीनाथ मुंडे' याच्या नावाने आहे. यामधे तब्बल आठ लाख मजूरांचा समावेश केला जाणार आहे. मोफत विमा संरक्षण,मोफत घरकुले,पाल्यांसाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती कौशल्यविकास आदी सुविधा योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत. या योजनेचे सर्व कामकाज परळी येथून चालणार आहे. स्व.गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणे पंकजा मुंडे यासुद्धा दिलेला शब्द पाळत आहेत. आणि गोपीनाथ मुंडे यांच्याकडून आलेला वारसा जपत आहेत.

नेटकर्यांनी केले ट्रोल
दसरा मेळाव्यात योजनेचा शब्द दिलात, शब्द पाळणार का? असा सवाल विचारत पंकजा मुंडे यांना ट्रोल केले होते.


जायकवाडी धरणात पाणी सोडण्यास विविध कारणांमुळे उशीर होत आहे. ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतचा आढावा घेऊन जायकवाडी धरण ६१ टक्के भरेल असा अंदाज होता. त्या अंदाजानुसार लगेच पुढच्या ३ दिवसात पाणी सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते.

मात्र आज एक आठवडा उलटूनही धरणात पाणी सोडलेले नाही. महाराष्ट्र जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने यावेळी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाला सुनावले. जायकवाडी धरणात पाणी सोडण्याची कार्यवाही त्वरित सुरु करा असेही सांगितले.

हायकोर्टाने दिलेला आदेशानंतरही अजून कुठलीच हालचाल दिसत नव्हती. यावेळी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून सांगतो असे उत्तर दिले आहे. वरिष्ठ जे निर्णय देतील त्यानुसार त्याची अंमलबजावणी होईल असे त्यांनी सांगितले. राजकीय दबावामुळे पाणी सोडले जात नाही, ठोक निर्णय त्यामुळेच घेतला जात नाही असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

यावर कधी निर्णय होणार? वरिष्ठ का पाणी सोडत नाहीत? उच्च न्यायालयाचे आदेशही पाळले जात नाहीत ? असे अनेक प्रश्न उभे असताना राजकीय आकसापोटी हे घडत असल्याची शक्यता आहे.

पुणे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार थापाडे आहे. ते सांगत असतात की २०३० पर्यंत सर्वांना घरे मिळतील. म्हणजे तोपर्यंत त्यांना मतदान करावे लागणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही फक्त घोषणा करतात. नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून मतं मागायची हे त्यांना चांगले जमते. दुष्काळाची परिस्थितीत घोषणा व आश्वासनांच्या पावसाद्वारे गाजर शेतीसाठी फुलविली जात आहे, अशी टीका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिरूर येथील शेतकरी मेळाव्यात केली.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिकाही दुटप्पी आहे. भाषण करताना सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांचे ते नाव आदराने घेतातल्याचे दाखवितात. मात्र, राजधानीत न्याय मागण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो. पुन्हा मीच पंतप्रधान होणार, मीच मुख्यमंत्री होणार असे दावे केले जात आहेत. आम्ही यांच्यासोबत पाच वर्षे कशी काढली आमचं आम्हाला ठाऊक आहे. 


पुणे :
शेतकरी व ग्रामीण जनतेची भेट घेतल्यावरच समजते की राज्यात परिस्थिती अत्यंत बिकट आहे. सरकारविरोधात वातावरण गरम आहे. याच उष्णतेची धग भाजप सरकारला कळली नाही तर, सिंहासन जळून जाईल, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील शेतकरी मेळाव्यातून त्यांनी पुन्हा एकदा भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली. ते म्हणाले की, महात्मा फुले यांच्या काळातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काही फरक पडला आहे असे वाटत नाही. राष्ट्रवादीची मला काळजी वाटते. आजूबाजूला दुष्काळ आहे, तेव्हा राष्ट्रवादीवाल्यांना धरणाच्या आजूबाजूला फिरकू देऊ नका असं म्हणत त्यांनी अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्याची आठवणही करून दिली.

अहमदनगर :
केंद्र व राज्य सरकारमध्ये राहून निर्णय घेण्याची क्षमता शिवसेनेत राहिलेली नाही. मित्रपक्ष भाजपाला ‘जुमलेबाज सरकार’ म्हणणारी शिवसेनाच सर्वात मोठा जुमला आहे. हा पक्ष केवळ सत्तेत राहून मलिदा खात आहे. “मोस्ट कन्फ्यूज्ड पॉलिटिशयन अॅवार्ड” असा पुरस्कार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यास हरकत नाही असा टोला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेला हणाला आहे.

शिर्डी येथील सभेत ठाकरे यांनी विखे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्याबद्दल छेडले असता विखे यांनी पत्रकारांना उत्तर देताना शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून काय काम करावं त्यांनी सांगायची गरज नाही. सेनेने स्वाभिमान केव्हाच गमावला आहे. आम्हाला सल्ला देण्यापूर्वी ठाकरे यांनी फसव्या भूमिकेबद्दल आत्मचिंतन करावे. जनतेच्या प्रश्नांबाबत प्रामाणिक असल्यास ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची नौटंकी करण्याऐवजी आजच सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान विखे यांनी दिले. आता यावर शिवसेना काय प्रत्युत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष आहे.

मुंबई : 
सोलापूर जिल्ह्यातील प्रलंबित असलेली विविध विकास कामे नियोजित वेळेत तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मंत्रालय येथे श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामाचा आढावा घेण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, सहकार विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय.एस.चहल तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशमुख यांनी  मंद्रूप येथे अतिरिक्त अप्पर तहसिल कार्यालय सुरु करण्यासाठी  आवश्यक त्या प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मंद्रूप येथे नवीन एम.आय.डी.सी  स्थापन करणे, मंद्रूप पोलीस स्टेशन व पोलिसांसाठी निवासस्थान बांधणे, ही कामे पूर्ण करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना श्री. देशमुख यांनी दिल्या. 

होटगी येथे प्रस्तावित ऊस संशोधन केंद्र, पंढरपुरी म्हैस संशोधन केंद्र, होटगी आश्रमशाळेसाठी मंजूर निधीबाबत माहितीचा आढावा, हत्तरसंग कुडल तीर्थक्षेत्र विकास निधी अंतर्गत मंजूर असलेला निधी वितरीत होण्यासाठी ग्रामविकास  विभागाने लवकरात लवकर मान्यता द्यावी. तसेच भीमा-सिना नदी जोडकालवा सर्वेक्षण अहवाल तातडीने पूर्ण करावा. त्याचबरोबर उजनी धरणाचे पाणी सिना नदीत नोव्हेंबरपूर्वी सोडण्याचे निर्देशही श्री. परदेशी यांनी यावेळी दिले.

हिप्परगा तलाव व परिसर पर्यटन खात्यास हस्तांतरण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही, भीमा नदीवर वडापूर येथे बॅरेजस बांधण्याबाबतचे डिझाईन  लवकरात लवकर तयार करुन शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, भंडारकवठे व कुरघोट येथील मोठ्या प्रमाणावर असलेल्या क्षारपड जमिनीबाबत जलसंपदा विभागाने बैठक घ्यावी, सोलापूर – मंगळवेढा रस्त्यावरील देगाव जलसेतू रेल्वे ओलांडण्याची संकल्पना मान्यतेसाठी रेल्वे खात्याकडे सादर करण्यात आली आहे. याबाबतची संकल्पना रेल्वे विभागाने लवकरात लवकर सादर करावी, असेही ते म्हणाले.   

याचबरोबर सोरेगाव राज्य राखीव बल (एस.आर.पी.) कॅम्प अंतर्गत रस्ते, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून (जलयुक्त शिवार) अर्थासहाय्य बाबत प्रस्ताव, उजनी जलाशय भीमा नगर येथे सोलर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याबाबत व वराह पालन सोसायटीची जागा म्हाडाने विकसित करणे, आदी विकास कामांच्या  सद्यस्थितीचा आढावा श्री. देशमुख यांनी यावेळी घेतला.

मुंबई :
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतक-यांनी एकत्रित येऊन शिखर संस्था काढून रेशीम उद्योगातील अडी अडचणी दूर करुन उद्योगाला चालना द्यावी असे आवाहन वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी आज केले. सद्य:स्थितीतील रेशीम उद्योजकांसाठीच्या योजना व भविष्यातील वाटचाली संदर्भात चर्चा करण्यासाठी तसेच काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज मंत्रालायात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर उपस्थित होते.

रेशीम उत्पादन करताना मनरेगांतर्गत योजना राबविताना योजनेचे अधिकार तहसिलदाराकडे असल्याने अडचण निर्माण होत होती, यापुढे रेशीम उत्पादनाची मनरेगाअंतर्गत करावयाच्या कामांचा अधिकार रेशीम उद्योग विभागाला देण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. रेशीम शेतक-यांना पुंज निर्मितीसाठी शासनामार्फत 50 रुपये प्रतिकिलो अनुदान तसेच रेशीम सूत निर्मितीसाठी 150 रुपयांऐवजी 250 रुपये प्रतिकिलो अनुदान देण्याच्या रेशीम उत्पादकांच्या मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

औरंगाबाद जिल्ह्यात 25 शेतक-यांचा एक गट अशा 50 गटांना चौकी संगोपन केंद्र चालविण्यास देण्याचा पथदर्शी उपक्रम राबविण्यात आला आहे. हाच उपक्रम पूर्ण राज्यात राबविण्यात यावा अशा सूचना श्री. देशमुख यांनी यावेळी दिल्या.  याच बरोबर चौकी कीटक संगोपन प्रशिक्षण राज्यात सुरु करण्यात यावे यावरही त्यांनी भर दिला. सध्या यासंदर्भातील प्रशिक्षण घेण्यासाठी दक्षिणेतील राज्यांमध्ये जावे लागते. राज्यातील शेतक-यांसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्ट‍िट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी या संस्थेच्या पायाभूत सुविधांचा वापर करून पहिले प्रशिक्षण नोव्हेंबर महिन्यात घेण्यात यावे असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

या बैठकीला वस्त्रोद्योग विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आभा शुक्ला, नियोजन विभागाचे उपसचिव श्री. कावते, रेशीम विभागाचे उपसंचालक अर्जून गोरे, प्रादेशिक रेशीम कार्यालय औरंगाबादचे   सहायक संचालक दिलीप हाके यांच्यासह रेशीम उत्पादक शेतकरी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुंबई : 
महाराष्ट्रात आरोग्य क्षेत्रात गुंतवणूक करण्यास चीनच्या उद्योजकांनी तयारी दर्शविली आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी चीनी उद्योजकांनी आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेतली. दरम्यान, जपानी औद्योगिक पार्कप्रमाणे चीनी औद्योगिक पार्क उभारण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याची तयारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने दर्शविली.

 चीनमधील नामांकीत फार्मा, बायो कंपनीचे प्रतिनिधी यानलिंग पॅन, हू कीन, तियान झीया आदींनी आज श्री. देसाई यांची मंत्रलयात भेट घेतली. पुणे जिल्ह्यातील चाकण, सुपे किंवा पिंपरी चिंचवड परिसरात औषध उत्पादने, योगा, मेडिटेशन, बायो मेडिसीन, बायो हेल्थ केअर आदी क्षेत्रात विशेष काम करण्याची तयारी चीनच्या उद्योजकांनी यावेळी दर्शवली. दोनशेहून अधिक गुंतवणूकदार या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास तयार असल्याचे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. चीनी कंपन्यात काम करण्यासाठी तीन हजाराहून अधिक अभियंत्यांना चीनी भाषेचे प्रशिक्षण दिले जात आहे.

 दरम्यान, गुंतवणूक वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव तत्पर असून जपानी कंपन्यांसाठी ज्याप्रमाणे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात आलेली आहे, त्याचधर्तीवर चीनी कंपन्यांसाठी चीनी पार्क तयार करण्याची तयारी एमआयडीसीने दर्शविली. शासनातर्फे उद्योगांसाठी जमीन, पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा पुरवण्यात येतील, अशी ग्वाही श्री. देसाई यांनी दिली.

 यावेळी डेन्मार्क येथील जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील रेईडार रोबड्रप रॅसम्यूसेन यांनीदेखील श्री. देसाई यांची भेट घेतली. महाराष्ट्रात नॅनो मॅन्युफ्रॅक्चरिंग क्षेत्रात काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. शिष्टमंडळात सिंगापूरचे काय सा नग, मांडके अँड मांडके कंपनीचे संचालक सुधीर मांडके, कृष्णन श्रीवासन, बालाजी स्वामी, प्रकाश कुलकर्णी आदी उपस्थित होते.

मुंबई : 
एएसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्येही वाढ करुन श्री. रावते यांनी अधिकारी - कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली. 

त्यानुसार राज्य शासनाप्रमाणे एसटी अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ६ टक्के इतकी वाढ जुन्या वेतनानुसार करण्यात आली. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल. वेतनवाढीमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन आधीच सुधारीत झाले आहे. त्यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र शासनाप्रमाणे २ टक्के इतकी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर २०१८ च्या वेतनापासून हा महागाई भत्ता देण्यात येईल.

एसटी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या पगारवाढीतील मागील थकबाकीतील ५ हप्त्यांची रक्कमही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर येत्या १ नोव्हेंबर रोजी त्यांना अदा करण्यात यावी, असे आदेशही महामंडळाला देण्यात आल्याचे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले. 

मुंबई : 
एसटी अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्याचा निर्णयही श्री. रावते यांनी आज जाहीर केला. ऑक्टोबर २०१८ पासून ही वेतनवाढ लागू होईल.      

एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांसाठी नुकतीच ऐतिहासिक अशी वेतनवाढ दिली आहे. त्याच धर्तीवर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही वेतनवाढ देण्यात येणार आहे. याबाबत अभ्यास करुन महामंडळाला शिफारस करण्यासाठी मंत्रालयातील निवृत्त अधिकाऱ्यांची दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महिन्यात अहवाल सादर करण्याबाबत या समितीस सुचीत केले असून त्यानंतर अधिकाऱ्यांना अंतिम वेतनवाढ दिली जाईल. तत्पूर्वी, या समितीचा अहवाल येईपर्यंत अधिकाऱ्यांच्या वेतनात त्यांच्या एकूण वेतनाच्या १० टक्के इतकी अंतरिम वाढ करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. रावते यांनी जाहीर केले. ऑक्टोबर २०१८ पासून ही अंतरिम वेतनवाढ लागू होत असून समितीच्या अहवालानंतर अंतिम वेतनवाढ लागू केली जाईल, असे मंत्री श्री. रावते यांनी सांगितले.


मुंबई :
एसटी महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज येथे केली. कर्मचाऱ्यांना २५०० रुपये तर अधिकाऱ्यांना ५००० रुपये दिवाळी भेट मिळणार आहे.

याशिवाय एसटी अधिकाऱ्यांना १० टक्के इतकी अंतरीम वेतन वाढ देण्याचा तसेच एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णयही आज जाहीर करण्यात आला. या निमित्ताने श्री. रावते यांनी आज एसटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची अनोखी भेट दिली.

श्री. रावते म्हणाले, एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना अनुक्रमे २५०० आणि ५०००  रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी – कर्मचाऱ्यांना ही दिवाळी भेट तातडीने देण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget