DNA Live24 2015

"निधी आपके निकट" हा कार्यक्रम 10 ऑक्‍टोबरला

अहमदनगर :
जिल्‍हयातील कर्मचारी  भविष्‍य निधी संघटनचे सदस्‍य आणि कंपनी मालकांसाठी दर महिन्‍याला  "निधी आपके निकट" हा कार्यक्रम आयोजित करण्‍यात येतो.  त्‍यानुसार माहे ऑक्‍टोंबर 2018 या महिन्‍याचा कार्यक्रम बुधवार  दिनांक 10 ऑक्‍टोबर 2018 रोजी  सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यत कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे.

जिल्‍हयातील पी.एफ सदस्‍य व निवृत्‍ती वेतन धारकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 12.30  वाजेपर्यंत व कंपनीचे मालक दुपारी 2 ते 4  या वेळेत निधी आपके निकट हा  कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे.  सहभागी सदस्‍यांनी कार्यक्रमाला येताना आवश्‍यक  सर्व कागदपत्रे बरोबर  घेऊन यावे.  त्‍यामुळे निधी आपके निकटमध्‍ये केस दाखल करण्‍यात सुलभ होईल, असे सहायक भविष्‍य निधी आयुक्‍त अभिषेक कुमार मिश्र यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget