DNA Live24 2015

11 डिसेंबरला ठरणार लोकसभेची पुढची दिशा..!

दिल्ली :
मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ, मिझोराम आणि तेलंगाणा या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने या राज्यांत आता आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी पत्रकार परिषदेत या राज्यांतील निवडणुकीच्या तारखेचे वेळापत्रक जाहीर केले.

मध्यप्रदेश व मिझोराम या दोन राज्यांत २८ नोव्हेंबर रोजी मतदान होईल तर, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांत ७ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच पाचव्या छत्तीसगढ या राज्यात मात्र दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. येथे पहिल्या टप्प्यात १२ नोव्हेंबर रोजी तर, दुसऱ्या टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल. या सर्व पाचही राज्यांतील निवडणुकांचा निकाल ११ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती आयोगाने दिली आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यात भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच येथील निकालानुसार २०१९ च्या लोकसभेचे वारे कसे राहील हे स्पष्ट होईल. त्यामुळेच याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget