DNA Live24 2015

12.94 कोटीच्या राशीन पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता

मुंबई :
मृद व जलसंधारण मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या पुढाकारामुळे आज राशीन ग्रामपंचायतीसाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत 12 कोटी 94 लाख रुपये खर्चाच्या नवीन पाणी पुरवठा योजनेस आज पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी तत्वतः मान्यता दिली. या योजनेची तांत्रिक मान्यता व इतर कार्यवाही येत्या पंधरा दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश मंत्रीमहोदयांनी यावेळी दिले. या योजनेमुळे राशीनकरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

राशीन पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळावी, यासाठी प्रा. राम शिंदे यांच्या विनंतीवरून पाणी पुरवठा मंत्री श्री. लोणीकर यांनी आज बैठक आयोजित केली होती. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. वेलरासू यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी, राशीनचे उपसरपंच साहेबराव साळवे, राजेंद्र देशमुख, ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील मोढळे, भीमराव साळवे, संतोष देवगावकर, विशाल देशमुख, राजेंद्र सावताडे, राहूल राऊत आदी यावेळी उपस्थित होते.

श्री. लोणीकर यांनी राशीन पाणीपुरवठा योजनेस मान्यता देतानाच यासंबंधीचे प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव आठ दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच ही योजना तातडीने सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले.

प्रा. राम शिंदे म्हणाले की, कर्जत-राशीन प्रादेशिक पाणी पुरवठा योजना निकामी झाल्यामुळे बंद पडली आहे. त्यामुळे दरवर्षी राशीनमध्ये पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी राशीन पाणी पुरवठा योजना ही राशीनकरांसाठी महत्त्वाची असून ती तातडीने सुरू होणे आवश्यक आहे. तसेच या योजनेच्या वीज पुरवठ्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करता येईल का याचा विचार करण्याचे संबंधितांना सूचना केल्या.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget