DNA Live24 2015

ई- मार्केटप्‍लेस : 15 ऑक्‍टोबरला कार्यशाळा; व्यावसायिकांना सुवर्णसंधी

अहमदनगर :
केंद्र शासनाने शासकीय खरेदीदार विभागांकडून वस्‍तू व सेवांच्‍या खरेदीसाठी गर्व्‍हनमेन्‍ट  ई- मार्केटप्‍लेस GeM पोर्टल विकसित करण्‍यात आले आहे.  या पोर्टलवर सद्यस्थितीत 25 हजार 800 उत्‍पादक पुरवठादार नोंदणीकृत असून सेवा उपलब्‍ध करुन देण्‍यात आलेल्‍या आहेत.  GeM पोर्टलवर खरेदी करता खरेदीदार विभागाच्‍या गरजेनुसार निविदा फॉर्म तयार करण्‍याची सूविधा असून जास्‍तीत जास्‍त पर्याय उपलब्‍ध  होऊन खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता येणार आहे.  तसेच वस्‍तू व सेवा प्रचलित बाजारभावापेक्षा कमी किंमतीत खात्रीशिरपणे उपलब्‍ध होणार आहेत.  महासंचालक पुरवठा व विल्‍हेवाट ही प्रक्रिया दिनांक 31 ऑक्‍टोबर 2017 पासून बंद झालेली आहे. या सघटनेमार्फत होणारी कार्यवाही ही GeM पोर्टलवर परावर्तीत होणार आहेत.

जिल्‍हयातील कार्यक्षेत्रातील औद्योगिक संघटना, उत्‍पादक, पुरवठादार यांना GeM या वेब पोर्टलबाबत व त्‍यामध्‍ये नोंदणी करण्‍यासाठी  जिल्‍हयातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी, शासकीय/निमशासकीय कार्यालयांसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन  येथे दिनांक 15 ऑक्‍टोबर 2018 रोजी सकाळी 11 वाजता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे.

तसेच जिल्‍हयातील  सर्व उत्‍पादक पुरवठांदाराकरिता विषयांकित प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 15 ऑक्‍टोबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता महाराष्‍ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्‍ट्रीज अॅन्‍ड अॅग्रीकल्‍चर (MCCIA) एम आय डी सी अहमदनगर येथे आयोजित केलेली आहे. या कार्यशाळेस सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्राचे महाव्‍यवस्‍थापक यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget