DNA Live24 2015

वाहनांचा 22 ऑक्‍टोबरला जाहीर लिलाव

अहमदनगर :
उप  प्रादेशिक परिवहन कार्यालय,अहमदनगर, तारकपूर बसस्‍थानक, एमआयडीसी पोलिस स्‍टेशन येथे अनेक वर्षापासून अनेक वाहने कर व दंड न भरल्‍यामुळे व इतर कारणासाठी अटकावून ठेवलेली आहेत. महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्‍वये नोंदणी प्राधिका-यांना असलेल्‍या अधिकारानुसार नोटीस जाहीर केले आहे.  या वाहन मालक, ताबेदार वित्‍तदात्‍यांनी जाहिररित्‍या कर व दंड भरुन वाहने सोडवून घेऊन जावेत.  

वायुवेग पथकांनी वेळोवेळी अटकावून ठेवलेल्‍या  वाहन मालकांना त्‍यांच्‍या नोंदणीकृत पत्‍यावर पोस्‍टाने नोटीसा पाठविण्‍यात आल्‍या आहेत. काही वाहन मालक त्‍या पत्‍यावर राहत नसल्‍याने  नोटीसा परत आल्‍या आहेत. मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीनुसार वाहन मालकांनी पत्‍यातील बदल  नोंदणी प्राधिका-यास कळविणे बंधनकारक असताना देखील  या वाहनाच्‍या मालकांनी या कार्यालयास तसे कळविले नाही .

वाहनाच्‍या मालकांनी, ताबेदारांनी, वित्‍तदात्‍यांनी  लिलावाच्‍या दिनांकापर्यत कार्यालयात थकीत कर व दंडाच्‍या रक्‍कमेचा भरणा करुन वाहने सोडवून घ्‍यावीत किंवा लिलावास हरकत  घ्‍यावयाची असल्‍यास 15 ऑक्‍टेाबर 2018 पर्यत लेखी हरकत द्यावी अन्‍यथा त्‍यांच्‍या वाहनाचा दिनांक 22 ऑक्‍टेाबर 2018 रोजी जाहीर लिलाव दुपासरी 4 ते 6 या वेळेत करण्‍यात येईल.  यांची नोंद घ्‍यावी  त्‍यानंतर वाहन मालकाची कोणतीही तक्रार  दावा याची दखल घेतली जाणार नाही . सदरची वाहने सोडवून नेण्‍याची ही अंतिम संधी असेल.

जाहीर लिलावात सामील होण्‍यासाठी रुपये 19.50/- प्रति किलो ही आधारभूत किंमत धरुन  यापेक्षा जादा भाव देण्‍या-या नागरिकांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर यांचेकडे आपल्‍या निविदा तीन प्रतीत भरुन कार्यालयात बंद पाकीटात 15 ऑक्‍टोबर 2018 पर्यत जमा कराव्‍यात.  जाहीर लिलावाचे स्‍थळ- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय अहमदनगर दिनांक 22 ऑक्‍टोबर 2018 रोजी  सायंकाळी 4 ते 6 पर्यत आहे.

जाहीर लिलाव करावयाच्‍या वाहनांचे ठिकाण, लिलावाच्‍या अटी व शर्ती या कार्यालयाच्‍या नेाटीस बोर्डावर दिनांक 15ऑक्‍टोबर 2018 पासून प्रदर्शित करण्‍यात येतील. कोणतेही कारण न देता जाहीर लिलाव रद्द करण्‍याचा  अथवा तहकुब ठेवण्‍याचे अधिकारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  अहमदनगर यांनी स्‍वतःकडे राखून ठेवले आहेत. या लिलावास अनामत रक्‍कम रुपये 25 हजार इतकी जमा करावी लागेल ( नॅशनलाईज्‍ बॅकेचा ड्रॉफ्ट आणावा)

वाहनाचा क्रमांक वाहन प्रकार व वाहन अटकावून ठेवल्‍याची वाहनांची माहिती उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, अहमदनगर येथे आपणास पाहावयास उपलब्‍ध आहे असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget