DNA Live24 2015

महापौर थिरकल्या दांडियाच्या तालावर

अहमदनगर :
संपुर्ण देशात नवरात्रीत असलेली धूम म्हणजे गरबा नृत्य. गरबा नृत्य हा गुजरात पुरता मर्यादित न राहता आपल्या भारताची ओळख बनली असून, याद्वारे आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन घडत असते. ही संस्कृती व हा लोकनृत्य प्रकार टिकविण्यासाठी शहरात आयोजित करण्यात आलेल्या पारंपारिक गरबा नृत्य कार्यशाळेचे उद्घाटन महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाले.

यावेळी यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील, नगरसेविका मनिषा बारस्कर, नॅशनल गरबा गोल्ड मेडलिस्ट जिगर सोनी, डॉ.जतिन पाटील, दर्शना शहा, आयोजक स्वप्नाली जंबे, श्रृती घोडके, अनुराधा कांबळे, रिध्दी पांचाळ, राधिका गुलाटी, स्वाती अट्टल आदिंसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
हॉटेल संजोग येथे आयोजित करण्यात आलेल्या या 7 दिवसीय कार्यशाळेस जिल्ह्यातील महिला व युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला आहे.

उद्घाटनप्रसंगी महापौर सुरेख कदम सह उपस्थित पाहुणे देखील दांडियाच्या तालावर थिरकल्या. या कार्यशाळेत महिलांना गुजरातचा पारंपारिक गरबा नृत्य प्रकार शिकवले जाणार आहे. यासाठी ज्याचे परदेशात देखील गरबा नृत्याचे क्लासेस चालतात असे नॅशनल गरबा गोल्ड मेडलिस्ट जिगर सोनी, डॉ.जतिन पाटील, दर्शना शहा मार्गदर्शन करीत आहे.

प्रास्ताविकात स्वप्नाली जंबे म्हणाल्या की, भारतात प्रादेशिक लोकनृत्याची परंपरा फार जुनी व समृध्द आहे. प्रत्येल लोकनृत्याची खास अशी ओळख आहे. समूहाने एकत्र येऊन केलेल्या नृत्यांमधून प्रदेश, जमात व संस्कृतीचे दर्शन घडत असते. संस्कृतीच्या संवर्धनासाठी लोकनृत्य महत्त्वाची भुमिका बजावत असतात. भारतामधील लोकनृत्याचा विचार केल्यास डोळ्यासमोर येते गरबा नृत्य. या पारंपारिक गरबा नृत्याच्या प्रसारासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर सुरेखा कदम म्हणाल्या की, आधुनिक युगात आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी या लोकनृत्याचा मोठा वाटा आहे. आपली संस्कृती प्रत्येकाने विविध सण उत्सवाच्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचे सांगितले. स्वाती अट्टल यांनी गरबा नृत्यासाठी मेकअप बद्दल उपस्थितांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget