DNA Live24 2015

शेतकरी प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे

अहमदनगर :
शेतकर्‍यांचे प्रश्‍न व लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी महात्मा गांधी यांना अभिवादन करुन भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन, पिपल्स हेल्पलाईन, मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलन, भारतीय जनसंसद आदि विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात अशोक सब्बन, अ‍ॅड.कारभारी गवळी, कैलास पटारे, सुधीर भद्रे, रामराव पाटील, पोपट साठे, शाहीर कान्हू सुंबे, रईस शेख, स्वप्निल पोटे, विवेक धोत्रे, जसवंतसिंग परदेशी, लक्ष्मण सतोळे, तुलसीराम पालीवाल, अशोक ढाकणे आदी सहभागी झाले होते. 

लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करुन तातडीने लोकायुक्ताची नेमणुक करावी, लोकपाल कायदा कमकुवत करणारे कलम 63 व 64 रद्द व्हावे, शेती उत्पादनावर आधारित शेतकर्‍यांना योग्य बाजारभाव मिळावा, ज्येष्ठ शेतकर्‍यांना दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळावी, शेतकर्‍यांचा व्यक्तीगत विमा उतरवावा, शेतकर्‍यांची पुर्ण कर्जमाफी करावी, निवडणुकित पक्षाचे चिन्ह रद्द करुन उमेदवाराचा फोटो बंधनाकरक करावे, मत मोजणीसाठी टोटलायजर मशीनचा वापर व्हावा, नोटाला राईट टू रिजेक्टचा अधिकार मिळावा व 3 वर्षापेक्षा जास्त खटला किंवा शिक्षा झालेल्या उमेदवारास  तिकीट देणार्‍या पक्षावर निवडणुक आयोगाने निर्बंध लावण्याची मागणी करण्यात आली आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget