DNA Live24 2015

कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

अहमदनगर :
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची 131 वी जयंती लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.आ. दादाभाऊ कळमकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी चालू वर्ष हे रयत शिक्षण संस्थेचे शताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार असून, विद्यालयात आगामी काळात नवनवीन उपक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी भरीव योगदान देण्याचे आवाहन केले. 

प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांनी प्रास्ताविकात विद्यालयात शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. रयत शिक्षण संस्थेचे सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी कर्मवीरांच्या कार्याची माहिती सांगताना त्यांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक विषमता दूर करण्यावर भर दिल्याचे अधोरेखित केले. ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.शिवाजी अनभुले व अ‍ॅड.अशोक बोरा यांनी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने रयत शिक्षण संस्था उभी राहिल्याचे सांगितले. तसेच वाचन संस्कृती जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तकाचे वाचन करण्याचे आवाहन केले. 

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अर्जुनराव पोकळे यांनी कर्मवीरांच्या जीवनपट उलगडून दाखवताना स्वातंत्र्यपूर्व काळातील बहुजन समाजाची स्थिती अण्णांचे कार्य व त्यांना लक्ष्मीबाईची साथ यावर प्रकाश टाकला. कर्मवीरांचे विचार आजच्या प्रगत समाजातही जोपासण्याची गरज असल्याचे विशद केले. याप्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या रांगोळी प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. तसेच विद्यालयाच्या तिसर्‍या मजल्याच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांनी साकारलेले शेवगा रोपवाटिकेची पाहणी मान्यवरांनी करून विद्यालय राबवत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपस्थितांच्या मनोगत सोबतच विद्यार्थ्यांची भाषणे लक्षवेधी ठरली. पाहुण्यांची रोपे देवून स्वागत करण्याची परंपरा उपस्थितांची दाद देऊन गेली. विद्यालयाच्या निवृत्त शिक्षिका श्रीमती शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना स्नेहभोजन दिले. यावेळी माध्यमिक विभागाचे प्राचार्य अरविंद काकडे रयत शिक्षण संस्थेचे जर्नल बॉडी सदस्य नितिन गोलेकर, विजय गोलेकर, मा.प्रा. विश्‍वासराव काळे, श्रावण चोभे, दोरगे सर नाना पंचक्रोशीतील कुसळे यांच्यासह पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मिता पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले. माणिक दळवी यांनी आभार मानले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget