DNA Live24 2015

नोंदणीकृत सामाजिक संस्थांना मिळणार अनुदान..!

अहमदनगर :
महाराष्‍ट्र  ग्राहक संरक्षण व मार्गदर्शन निधी नियम 1992 मधील परिच्‍छेद 7  नुसार राज्‍य शासनाकडून सहाय्यक अनुदान वितरीत करण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ग्राहक चळवळ व ग्राहक जनजागृती  व इतर  क्षेत्रात  काम करणा-या  परंतू ग्राहक चळवळ , ग्राहक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करुन ग्राहकांच्‍या हक्‍काचे संरक्षण व सवर्धनाचे कार्य करणा-या नोंदणीकृत सामाजिक संस्‍थाकडून अनुदानासाठी 10 नोव्‍हेंबर 2018 पर्यत  प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहेत.

अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्‍या दिनांक 26 जूलै 2017 च्‍या शासन निर्णयानुसार ग्राहक जनजागृती क्षेत्रात काम करणा-या नोंदणीकृत सामाजिक संस्‍थांना शासनाकडून अनुदान वितरीत करण्‍याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्‍यात आल्‍या आहेत. अर्जाचा नमुना महाराष्‍ट्र शासनाच्‍या www.maharashtra. gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

नोंदणीकृत सामाजिक संस्‍थांनी विहित नमुन्‍यातील प्रस्‍ताव दिनांक 10 नोव्‍हेंबर 2018 पर्यत संबंधित जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे कार्यालयीन वेळेत किंवा त्‍यापूर्वी प्राप्‍त होतील या बेताने पाठवावेत.  सादर प्रस्‍ताव विहित मुदतीनंतर प्राप्‍त झाल्‍यास त्‍याचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्‍यावी. तसेच यामध्‍ये बदल करण्‍याचे सर्व अधिकार अन्‍न  नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने राखून ठेवले आहेत असे जिल्‍हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांनी एका प्रसिध्‍दीपत्रकान्‍वये कळविले आहे.  

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget