DNA Live24 2015

बुरशीचा प्रतिजैविक म्हणून औषधांमध्ये उपयोग; विखे यांचे संशोधन

अहमदनगर :
मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या समुद्रातील दुर्मिल बुरशीचा प्रतिजैविक म्हणून औषधांमध्ये कसा उपयोग होऊ शकतो याचे संशोधन करून लोणी येथील पद्मश्री डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयातील प्राध्यापिका जयश्री विखे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएचडी मिळवली आहे.

विखे पाटील महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. पारनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर, डॉ.सजन खपके, सोनई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक तुवर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. समुद्रामध्ये असंख्य बुरशी आढळतात. त्यातील मानवी आरोग्यासाठी वरदान ठरणार्‍या बुरशींचा शोध घेऊन त्यांच्या आधारे प्रतिजैविके म्हणून औषधात वापर करून अनेक आजारांवर यशस्वी उपचार करण्यासाठी हे संशोधन अतिशय महत्त्वाचे आहे. त्यांच्या संशोधनासाठी प्रवरा शिक्षण संस्थेचे महासंचालक डॉ.सर्जेराव निमसे, प्राचार्य डॉ.प्रदीप दिघे, विभागप्रमुख डॉ.रामदास बोरसे यांचे सहकार्य लाभले. या यशाबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील, शालिनीताई विखे पाटील, अण्णासाहेब म्हस्के, डॉ.सुजय विखे पाटील यांनी जयश्री विक्रम विखे यांच्या संशोधनाचे कौतुक केले. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget