DNA Live24 2015

काळी आई मुक्तीसंग्रामाच्या वतीने आंदोलनाची घोषणा

अहमदनगर :
अनेक वर्षापासून ताब्यात असलेल्या खळे वाडग्यांची मालकी शेतकर्‍यांना मिळण्यासाठी काळी आई मुक्तीसंग्रामाच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. सन 1980 च्या अगोदरच्या शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या वन विभागाच्या जमीनी नवीन कायद्याने शेतकर्‍यांच्या नावावर झाल्या आहेत. मात्र महसुल विभाग या जमीनीची मालकी शेतकर्‍यांच्या नावावर करण्यासाठी चालढकल करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.  

ज्या शेतकर्‍यांच्या ताब्यात खळे वाडगे आहेत मात्र मालकी शासनाची आहे. अशा शेतकर्‍यांना कुठल्याही प्रकारे शासनाच्या योजनेचा लाभ घेता येत नाही अथवा कर्ज देखील मिळत नाही. सन 1980 च्या अगोदरच्या वन विभागाच्या शेतकर्‍यांकडे असलेल्या वर्ग 2 च्या जमीनी नवीन कायद्याने शेतकर्‍यांच्या नावावर करण्यात आल्या. मात्र अशा जमीनीवर शेतकर्‍यांचा मालकीहक्क लावण्यासाठी महसुल विभागाचे अधिकारी तयार नाही. यासाठी शेतकर्‍यांची मोठी आर्थिक लुट चालू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.     
  
शेतकर्‍यांच्या ताब्यात असलेल्या या जमीनीची मालकी त्यांना मिळाल्यास शासकीय योजनांचा लाभ घेता येणार आहे. त्याचप्रमाणे बँके कडून कर्ज मिळून ग्रामोद्योग उभारता येणार आहे. या वर्ग 2 च्या जमीनी शेतकर्‍यांच्या नावावर करण्यासाठी शेतकर्‍यांना संघटित करुन आंदोलन केले जाणार असल्याची भुमिका अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी मांडली. शेतकर्‍यांच्या न्यायहक्काच्या आंदोलनासाठी अ‍ॅड.गवळी, कॉ.बाबा आरगडे, सोमनाथ दरंदले, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget