DNA Live24 2015

पार्थ यांच्या उमेदवारीला पवार साहेबांचा रेड सिग्नल..!


पुणे :
मावळ लोकसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या उमेदवारीवरून चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पार्थ यांना उमेदवारी देण्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार साहेब अनुकूल नसल्याचे बोलले जात आहे. एकूणच घराणेशाहीच्या मुद्द्यावर येथे होणारा विरोध आणि इतर मुद्दे लक्षात घेता येथून पार्थ पवार यांच्या उमेदवारीला पक्षाने रेड सिग्नल दिल्याचेच म्हटले जात आहे.

पक्षाची बांधणी करण्यासाठी सामान्य कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज असल्याचा संदेश पवार साहेबांनी वेळोवेळी दिला आहे. त्यातच पार्थ यांच्या उमेदवारीवर मागील आठवड्यात चर्चा सुरू झाली. त्यामुळे या मतदार संघातील इच्छुक आणि सामान्य कार्यकर्ते सैरभैर झाले होते. तर, इतर पक्षांनी आपापले गणित कोणत्या मार्गाने जुळवायचे याबद्दल चर्चा सुरु केली होती. याच पार्श्वभूमीवर पवार साहेब या उमेदवारीबद्दल अनुकूल नसल्याने हा मुद्दा मागे पडला आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget