DNA Live24 2015

शेतकऱ्यांना रुपयाचीही कर्जमाफी नाही : गांधी


जयपूर :
चार वर्षांच्या सत्ताकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप सरकारने शेतकऱ्यांचे एक रुपयाही कर्ज माफ केले नाही. या सरकारने देशात श्रीमंत आणि गरीब असे दोन तुकडे केले. अशा टोकदार शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थानच्या भरतपूरमध्ये एका रॅलीत बोलताना टीका केली.

ते म्हणाले की, राफेल करारावर बोलायला हे सरकार घाबरत आहे. फक्त आश्वासने देऊन मोदीजी दिशाभूल करीत आहेत. देशात बेरोजगारीची समस्या मोठी आहे. सरकारचे याकडे लक्ष नाही. काही लोकांच्या फायद्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. देशातील सर्वसामान्य जनता निराश आहे. राजस्थानात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास प्रश्न सोडविण्यासह विकासाच्या योजना राबविण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू. काँग्रेस खोटं बोलणार नाही, उगीच आश्वासने देणार नाही.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget