DNA Live24 2015

अल्पसंख्याकबहुल संस्थांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान

अहमदनगर :
अल्‍पसंख्‍याक  विकास विभागाने धार्मिक अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थ्‍याचे बाहुल्‍य  असलेल्‍या  राज्‍यातील शासन मान्‍यताप्राप्‍त अनुदानित,विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालये, औद्योगिक  प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळांना पायाभूत सुविधा उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी 2 लाखांपर्यत अनुदान देण्‍यात येणार आहे. या अनुदानासाठी इच्‍छूक शाळा, संस्‍थांनी विहित नमुन्‍यातील  प्रस्‍ताव दिनांक 30 ऑक्‍टोबर 2018 रोजी पर्यंत सादर करावेत

योजनेच्‍या अटी व शर्ती – अल्‍पसंख्‍यांक समाजाचे ( मुस्‍लीम, बौध्‍द , ख्रिचन, जैन, शीख पारशी व ज्‍यु  मिळून)  किमान 70 टक्‍के व शासन मान्‍यता प्राप्‍त अपंगाच्‍या शाळांमध्‍ये किमान 50 टक्‍के अल्‍पसंख्‍यांक विद्यार्थी शिकत असणे आवश्‍यक आहे.  या योजनेतर्गंत  शाळेच्‍या इमारतीचे नुतनीकरण व डागडूगी, ग्रंथालय आद्यायवत करणे,  संगणक कक्ष उभारणे, अद्यायावत करणे, शैक्षणिक कार्यासाठी  आवश्‍यक फर्निचर ,  इनर्व्‍हटरची सुविधा निर्माण करणे, अध्‍ययनाची साधने ( लनिंग मटेरियल)  अध्‍ययनासाठी लागणारे विविध सॉफटवेअर, इंग्रजी लॅग्‍वेज लॅब, शुध्‍द पेयजलाची सुविधा करणे,  प्रयोगशाळा उभारणे, अद्यावत करणे, प्रसाधनगृह, स्‍वच्‍छतागृह उभारणे, डागडूगी, झेरॉक्‍स मशीन, एल.सी.डी प्रोजक्‍टर व संगणक हार्डवेअर सॉफटवेअर  या पायाभूत सुविधांसाठी अनुदान देण्‍यात येणार आहे.

या योजनेचा विहित नमुन्‍यातील अर्ज https://mdd.maharashtra.gov.in  या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध आहे. इच्‍छूक शाळा, कनिष्‍ठ महाविद्यालये, औद्योगिक  प्रशिक्षण संस्‍था व अपंग शाळा यांनी  दिनांक 30 ऑक्‍टोबर 2018  पर्यंत जिल्‍हा नियोजन समिती, जिल्‍हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे प्रस्‍ताव  सादर करावेत.  प्रत्‍येक शैक्षणिक संस्‍थेने DIES, CODE, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थांनी इन्‍स्‍टीटयूट कोड तसेच अपंग शाळांनी  लायसन्‍स नंबर देणे आवश्‍यक आहे.  विहित मुदतीनंतर प्राप्‍त झालेले प्रस्‍ताव ग्राहय धरले जाणार नाहीत असे अहमदनगर जिल्‍हाधिकारी यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget