DNA Live24 2015

गल्लामंत्री यांच्याकडून सर्वांची घोर निराशा..!

जळगाव :
फैजपूर येथील जे. टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयात अायाेजित अटल महाकृषी कार्यशाळेत भाजपच्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. मात्र, या ठिकाणी अर्थमंत्री म्हणजे गल्लामंत्री असे कौतुक करून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी अपेक्षा व्यक्त केली की, अर्थमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दशा पालटण्यासाठी या कार्यक्रमात ठोस मदतीची घाेषणा करावी. मात्र, त्यास न जागता गल्लामंत्र्यांनी घोर निराशा केल्याची चर्चा आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे नीदेखील अर्थमंत्री असल्याने विशेष काही पदरात पडेल ही अपेक्षा व्यक्त केली. खडसे म्हणाले की, केळी उत्पादकांचे सव्वाशे काेटींचे नुकसान झाल्याने ही भरपाई द्यावी. प्रक्रिया उद्याेगाला अनुदान द्यावे. अर्थमंत्र्यांनी याच कार्यक्रमात घाेषणा करावी. अामदार हरिभाऊ जावळे यांनी प्रास्ताविकातदेखील अर्थमंत्र्यांचा विशेष उल्लेख केल्याने कार्यशाळेसाठी अालेल्या ४ हजार शेतकऱ्यांना अर्थमंत्र्यांच्या घाेषणेची प्रतीक्षा हाेती. मात्र, तिथेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जळगाव भाजपला घराचा आहेर दिला. ते म्हणाले की, जळगावमधील मंत्री मुख्यमंत्री साहेबांच्या घनिष्ठ असतानाही या शहराचा व जिल्ह्याचा विकास करणाऱ्या प्रकल्पाच्या फाईल कशा परत येऊ शकतात. अर्थमंत्र्यांच्या घाेषणेची अातुरतनेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसह नेत्यांची मात्र या कार्यक्रमात घाेर निराशा झाली.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget