DNA Live24 2015

'बारामतीच्या दादां'च्या घोषणेने 'प्रवरेच्या दादां'ची उमेदवारी धोक्यात?

अहमदनगर :
नगर दक्षिण भागावर आपलाच हक्क असल्याच्या थाटात प्रवरेचे दादा सुजय विखे यांनी दीड वर्षांपासून प्रचाराची राळ उडवून दिली आहे. मात्र, त्यांच्या याच मानसुब्यांना ब्रेक लावण्यासाठी बारामतीकर सरसावले आहेत. मोठ्या पवार साहेबांसह (शरद पवार) आता माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अहमदनगर लोकसभेची जागा राष्ट्रवादीच लढविनावर असल्याची घोषणा केली आहे.

वडील राधाकृष्ण विखे पाटील राज्याचे विरोधीपक्ष नेते, आई शालिनीताई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि स्वतः सुजयदादा यांच्याकडेही काँग्रेस पक्षाचे पद आहे. असे असतानाही काँगेस पक्षावर भरोसा न ठेवता सुजयदादांनी लोकसभेसाठी अपक्ष किंवा भाजपच्या गोटात जाऊन लढण्याची तयारी ठेवली होती. आमदार शिवाजी कर्डीले यांनी त्यांना अनेकदा पक्ष बदलाची खुली ऑफर दिली होती. तर सुजयदादा यांनीही अपक्ष का होईना पण नगरची जागा लढविणारच याबद्दल अनेकदा घोषणा केली आहे.

प्रवरेच्या दादांच्या याच घोषणाबाजीला ब्रेक लावण्यासाठी आता राष्ट्रवादी सारसावली आहे. जगावाटपात ही जागा राष्ट्रवादी पक्षाकडे आहे. त्यावर या पक्षाने हक्क सांगून विजयासाठी लढण्याची तयारी केली आहे. बारामतीकर मंडळींनी पुन्हा एकदा प्रवरेच्या शिडातली हवा काढून घेण्यासाठी तयारी केली आहे. त्यावर विखे गट कोणती खेळी करतो याकडे राज्याचे लक्ष असेल.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget