DNA Live24 2015

ऑनलाईन खरेदीसाठी मिळणार बिनव्याजी *६० हजारांचे कर्ज..!


दिल्ली :
दिवाळीपूर्वी येणाऱ्या दसऱ्यालाच यंदा ऑनलाईन शॉपिंग कंपन्या सीमोल्लंघन करणार आहेत. त्याची नांदी फ्लिपकार्ट कंपनीने सुरु केली होती. त्यात आता आघाडीच्या अॅमेझॉन कंपनीनेही उडी घेतली आहे. या कंपनी ऑनलाईन खरेदीसाठी ६० हजार रुपयांपर्यंत घसघशीत बिनव्याजी कर्ज देणार आहेत. या ऑफरकडे ऑनलाईन खरेदीदारांची लक्ष लागले आहे.

प्रतिवर्षी दसरा व दिवाळीत अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन शॉपिंग पोर्टलकडून शॉपिंग फेस्टिवल जाहीर केले जातात. यंदाही अशाच पद्धतीने या दोन मल्टीनॅशनल कंपन्या स्पर्धेत उतरत आहेत. भारतीय बाजारपेठेतील आपला टक्का वाढविण्यासाठी या दोन्ही बलाढ्य कंपनी यंदा बिनव्याजी कर्जासह इतरही काही योजना जाहीर करीत आहेत.

१० ऑक्टोबरपासून अॅमेझॉन कंपनी आपला सर्वात मोठा वार्षिक फेस्टीव सिझन सेल सुरु करत आहे. त्यासाठीची तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे. तर दुसरीकडे फ्लिपकार्टही बिग बिलियन सेल सुरु करत आहे. यंदा या कंपन्यांकडून ग्राहकांना डेबिट कार्डवर ईएमआय, नो कॉस्ट ईएमआय आणि पेबॅक गॅरंटी अशा सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे यंदा ग्राहकांची खरेदीची चंगळ होणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget