DNA Live24 2015

पेट्रोल, डिझेल व गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करण्याची मागणी

अहमदनगर :
सर्वांसाठी अत्यावश्यक झालेल्या पेट्रोल, डिझेल व गॅसचा जीएसटी मध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी अहमदनगर शहर व जिल्हा युवक काँग्रेस तसेच पक्षाच्या सर्व फ्रंटच्या वतीने शहरातील टॉपअप पेट्रोल पंप समोर मानवी साखळी तयार करून आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व गॅसचा जीएसटी मध्ये समावेश झाल्यास त्यांचे वाढते दर आटोक्यात येणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

डॉ. सुजय विखे व सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल वारे, जिल्हाध्यक्ष कुलदीप भिंगारदिवे, गौरव ढोणे, शहर उपाध्यक्ष अमन तिवारी, मुन्नाशेठ चमडेवाले, बाळासाहेब पवार, बाळासाहेब भुजबळ, बाळासाहेब भंडारी, मोबीन शेख, चंद्रकांत हारेर, वसीम पठाण, उबेद शेख, अज्जू शेख, अमोल लगड, गणेश भोसले, फर्मान मोहम्मद, वसीम सय्यद, सविता मोरे, सुनिता बागडे, रंजनी ताठे, जरीना पठाण आदी सहभागी झाले होते.
निखिल वारे म्हणाले की, पेट्रोल, डिझेलवर दोन ते पाच रुपयांनी दर कमी करुन तात्पुरत्या स्वरुपात नागरिकांच्या आक्रोशावर मलमपट्टी करण्यात आली आहे. या अत्यावश्यक गोष्टींचा जीएसटी मध्ये समावेश केल्यास 25 ते 30 रुपयांनी पेट्रोल, डिझेल स्वस्त होऊन महागाईच्या काळात सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खोटी जाहिरातबाजी करुन सत्ताधारी भाजप सर्वसामान्यांच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget