DNA Live24 2015

राजकीय गोलमाल.. कार्यकर्ते बेहाल..!


कुणाला उशीर, कुणाला ऑफर, कुणी हजर, कुणी गैरहजर..

राजकारणात छोट्या-छोट्या गोष्टींचे अर्थ आणि त्यापाठीमागचे उद्देश हे कळणे कठीण काम. साताऱ्याचे खासदार पवारसाहेबांच्या बैठकीला निघाले, पण ठिकाणाच ठाऊक नसल्याने ऊशीर झाला.

यावेळी "ट्राफिक जामचे" कारण पुढे करत वेळ मारून नेली. परंतू ते येण्यापूर्वी बैठकीत शिजलेली डाळ उमेदवारीला “जाम” लावू शकते.
त्यातच खुल्या स्वभावाच्या खासदारांना नितीश राणे आणि रामदास आठवले यांनी खुल्या ऑफर दिल्या. त्यामुळेच उदयन राजे निश्चिंत असावेत असा अंदाजही बांधला जातोय. तूर्तास तरी पवारसाहेबांचा कॉल मिळेपर्यंत राणे आणि आठवले दोघांनाही त्यांनी वेटिंगवर ठेवले आहे.

राष्ट्रवादीचे हे कोडे सुटते न सुटते तोच भाजपच्या नेत्यांनी नवीन राडा घालून ठेवलाय. जळगावमधील फडणवीसांच्या अत्यंत महत्वाच्या बैठकीत एकनाथ खडसे गैरहजर होते. मध्यंतरी त्यांनीही पक्षविरोधी भुमिका घेण्याचा सपाटा लावला होता. त्यातच त्यांचे कुणी कान फुंकले कि काय अशी शंका भाजपा पदाधिकार्यांना येत आहे.

त्यातच ठिणगी म्हणजे आज अहमदनगरमध्ये रावसाहेब दानवे यांच्या स्वागताला जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ईच्छूक दावेदार नितीन उदमले होते. यावेळीही भाजपचे ईतर पदाधिकारी कुठे गेले हा प्रश्न स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांना पडला आहे. निवडणुका तोंडावर असताना असे कोडे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष घालत आहेत.
त्यामुळे कार्यकर्त्यांसोबत दुसर्या फळीतील पदाधिकाऱ्यांमधेही संभ्रम निर्माण झालेला आहे.

(द्वारा : विनोद सूर्यवंशी)

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget