DNA Live24 2015

लघु व मध्यम शेतकऱ्यांची संख्या वाढतेय...

दिल्ली :
जमिनीची विक्री करून शेती क्षेत्रातून बाहेर पडणाऱ्यांच्या वाढत्या संख्येमुळे देशातील हेक्टरी जमीनधारणा क्षमता कमी होत आहे. मागील कृषी गणनेच्या तुलनेत यंदा यात ७ गुंठ्यांनी कमीची नोंद झाली आहे.

भारतातील लागवडीखालील शेतीपैकी ८६.२१ % शेतकरी लहान व किरकोळ शेतकरी आहेत. त्यांच्याकडे २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे. तर, १० हेक्टर आणि त्यापेक्षा जास्त जमीन केवळ 0.५७ % शेतकऱ्यांकडे आहे. २०१०-११ मध्ये सरासरी जमीन धारण क्षमता १.१५ हेक्टर होती. तर, २०१५-१६ मध्ये तीच क्षमता १.०८  हेक्टरवर घसरली आहे.

२०१०-११ मध्ये महिला शेतकऱ्यांची टक्केवारी १२.७९ % होती. ती वाढून २०१५-१६ मध्ये १३.८७ % झाली आहे. शेतीवरील होल्डिंग्जच्या संरचनात्मक पैलूंवर माहिती गोळा करण्यासाठी पाच वर्षाच्या कालावधीत भारतात कृषि जनगणना आयोजित केली जाते. त्याची आकडेवारी आता जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget