DNA Live24 2015

तर अंबानींच्या घरावर मोर्चा : शेट्टी

परभणी :
शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत़. तर, रिलायन्स कंपनीला शासन एवढे पाठिशी घालीत आहे. येत्या आठ दिवसांत परभणीतील पीकविमा प्रश्नी शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

पीक विम्यापासून वंचित जिल्ह्यातील शेतक‍ऱ्यांनी रिलायन्स पीकविमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. खा.शेट्टी म्हणाले, कृषी आणि महसूल विभागातील अधिकाऱ्यांंच्या सहाय्याने शेतकऱ्यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले. परंतु विमा परतावा न देणाऱ्या अंबानी यांनी शेतकऱ्यांच्या पैशांवर दरोडा घातला आहे. पीकविमा संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदवली आहे. परंतु शासन रिलायन्स कंपनीसमोर झुकत आहे. देश कार्पोरेट कंपन्यांना गहाण ठेवण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget