DNA Live24 2015

राहुरी येथे किसान आधार संमेलन

अहमदनगर :
महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षनिमित्‍त मध्‍यवर्ती परिसर राहुरी येथे दिनांक 15 ते 19 ऑक्‍टोबर 2018  रोजी या कालावधीत किसान आधार संमेलन 2018 चे भव्‍य आयोजन करण्‍यात आले आहे.

किसान आधार संमेलनात भव्‍य कृषी व पशु प्रदर्शन, पीक प्रात्‍यक्षिके , शेतकरी शास्‍त्रज्ञ  चर्चासत्राचे आयोजन करण्‍यात आले आहे. या कृषी प्रदर्शन आपल्‍या शैक्षणिक संस्‍थेतील सर्व विद्यार्थी , पालक , प्राध्‍यापक, शिक्षक  व कर्मचारी यांच्‍यासाठी अत्‍यंत महितीपूर्ण असे आहे. या प्रदर्शनाची वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5  वाजेपर्यत सर्वासाठी विनामुल्‍य  उपलब्‍ध आहे.  या प्रदर्शनास भेट देवून लाभ घ्‍यावा असे महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे विस्‍तार शिक्षणचे संचालक डॉ. किरण कोकाटे यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget