DNA Live24 2015

तर बाबा असतील पुण्याचे उमेदवार..!

पुणे :
राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. मात्र, त्याचवेळी राज्याची राजकीय डावपेचाचा राजधानी म्हणूनही बिरुद या शहराने पक्के केले आहे. पुण्याचा कल म्हणजेच देशाच्या राजकारणाची दिशा, असे समीकरण पुन्हा एकदा पक्के होत आहे. अशावेळी येथून काँग्रेस पक्षाकडून पुढील निवणडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज (बाबा) चव्हाण यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यातून सत्तेचे गणित पक्के करण्याचे सर्वपक्षीयांचे काम जोरदार चालू आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस दररोज नविन धक्का देत आहे. असे असताना मित्रपक्ष काँग्रेसनेही धक्का दिला तर त्यात वावगे ते काय..! पुणे लोकसभेसाठी पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी देणार असल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात चालली आहे. मागील 2 वर्षात पृथ्वीराज चव्हाण यांचा पुण्यात चांगला संपर्क आहे. विविध कार्यक्रमांना ते जाणीवपूर्वक हजेरी लावत का होते? या त्यावेळी पडलेल्या कोड्याचा उलगडा कार्यकर्त्यांना आताशी झाला आहे. 

पुण्यातील मतदार राजा सुशिक्षित आणि सुजान असल्याने तिथे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी पोषक वातावरण आहे, अशी पक्षाची भावना आहे. जाणकार आणि स्वच्छ प्रतिमेचा राजकारणी अशी ओळख असलेल्या चव्हाणांना पुणे मानवेल असा विश्वास जेष्ठ  दिल्लीवाल्यांना आहे. तसेच त्यांना दिल्लीच्या राजकारणात परतायचे आहे असेही सुत्रांचे म्हणने आहे. एकूणच अशावेळी बाबांना पुण्याचा खासदार करण्यासाठी काँग्रेस ताकद लावणार नाही, असेही नाही...

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget