DNA Live24 2015

आंदोलक शेतकरी ठाम; सरकारचा तोडगा अमान्य

दिल्ली :
एकूण ११ मागण्या असतानाही केंद्र सरकारने फक्त ७ मागण्यावर सहमती दर्शवली आहे. उरलेल्या आणखी ४ प्रमुख मागण्यांबाबत कोणतेही ठोस आश्वासन मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी या आंदोलनावर ठाम आहेत, अशी माहिती किसान युनियनचे प्रवक्ते युद्धवीर सिंह यांनी दिली आहे. त्यानुसार दिल्लीमधील आंदोलन सुरु राहणार आहे. भारतीय किसान युनियनने ‘किसान क्रांती यात्रा’ या मोर्चाचे आयोजन केले आहे. 

स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दीडपट हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी मिळण्यासह वीजदर कमी करण्यास विविध ११ मागण्यांसाठी देशभरातील शेतकरी गांधी जयंतीला (२ ऑक्टोबर) दिल्लीत धडकले होते. मात्र, या शांततापूर्ण मोर्चावर केंद्र सरकारने लाठीचार्ज केल्याने आंदोलक संतप्त झाले आहेत. दि. २३ सप्टेंबरला हरिद्धारमधून या पदयात्रेला सुरुवात झाली होती. दि. १ ऑक्टोबर रोजी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत चर्चा विस्कटल्यानंतर शेतकरी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. या मोर्चात ५० हजारहून अधिक शेतकरी सहभागी झाले आहेत. २ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील राजघाट येथे या यात्रेचा समारोप होणार होता. मात्र, सरकारच्या दडपशाही धोरणामुळे हे आंदोलन चिघळले आहे.
दिल्ली- उत्तर प्रदेशच्या सीमेवर पोलिसांनी किसान यात्रा रोखली आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या असून शेतकऱ्यांवर बळाचा वापर करण्यात आल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या सर्व मागण्यांवर विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते मात्र, ‘किसान क्रांती यात्रा’ने सरकारचे आश्वासन मान्य नसल्याचे सांगत आंदोलनाचा पवित्रा कायम असल्याचे सांगितले आहे. केंद्र सरकारने दिलेले आश्वासन मान्य नसल्याने आंदोलन सुरूच राहणार, असे शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी सांगितले आहे. त्यामुळे गांधी जयंतीला सुरू झालेले आंदोलन पुढे सुरू राहणार आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget