DNA Live24 2015

महावितरण कार्यालयात ठिय्या

अहमदनगर :
मुकुंदनगर येथील फकिरवाडासह विविध भागात 9 तास भारनियमन केल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी महावितरण कार्यालयात मा.नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. शहर कार्यकारी अभियंता नितीन धर्माधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करीत नागरिकांनी त्यांना धारेवर धरले. नुकतेच नव्याने रुजू झालेल्या धर्माधिकारी यांनी सदर भाग डी झोनमध्ये असल्याने भारनियमन चालू असून, रात्री भारनियम केले जाणार नसल्याचे आश्‍वासन दिले.

या आंदोलनात प्रकाश पाडळे, राजू शेख, वसीम शेख, इम्रान शेख, साकिब शेख, अरबाज शेख, बशीर शेख, महेमूद पठाण, फारुक शेख, अमजद शेख आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मुकुंदनगर येथील फकिरवाडासह विविध भागात महावितरणने 9 तासाचे भारनियमन केले आहे. सणासुदीचे व विद्यार्थ्यांचा परिक्षेचा काळावधी असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात भारनियमन करुन महावितरणने या भागातील नागरिकांवर अन्याय केला आहे. परिसरातील नागरिक वेळेवर वीज बिल भरत असून, काही नागरिकांच्या थकित वीज बिलामुळे सर्व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर भारनियमन कमी न झाल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा मा.नगरसेवक शेख मुदस्सर अहमद यांनी दिला आहे. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget