DNA Live24 2015

सर्वेक्षणाने उडाली भाजप नेत्यांची झोप..!

मुंबई :
दिल्लीतील चाणक्य या नामांकित राजकीय सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीच्या राज्यस्तरीय सर्वेक्षणाने भाजपमधील धुरीणांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणावीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही या आकडेवारीने झोप उडल्याची पक्ष कार्यालयात चर्चा आहे.

केंद्रासह राज्यात भाजपचे सरकार आहे. या दोन्ही सरकरांबद्दल ग्रामीण भागातील जनता व मध्यमवर्गीय नागरिकांत तीव्र असंतोष आहे. चुकीच्या आर्थिक धोरणाबद्दल उद्योजक व व्यावसायिक नाराज आहेत. काही वृत्तपत्रे व संस्थांनी यालाच डावलून सरकारचे गोडवे गाणारे सर्वेक्षण प्रसिद्ध केले होते. मात्र, आता पक्षाने केलेल्या अंतर्गत सर्व्हेत भाजपचे पितळ उघडे पडले आहे. त्याचाच धसका श्रेष्ठींनी घेतला आहे.

भ्रष्टाचार व चालढकल करण्याच्या मुद्द्यावर देशातून काँग्रेस पक्ष पिछाडीवर गेला होता. मात्र, सत्तेची संधी मिळालेल्या भाजपने चुकांची पुनरावृत्ती करून पुन्हा काँग्रेसला 'अच्छे दिन' आणले आहेत. त्याचेच प्रतिबिंब 'चाणक्य'च्या सर्वेक्षणात दिसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget