DNA Live24 2015

सुप्रियाताईंची क्लुप्ती, सरकारला विनंती..!

औरंगाबाद :
जसजशा निवडणुका जवळ येत आहेत, तसे विरोधीपक्षाच्या नेत्यांना सरकारवर टीका करण्यासाठी संधी सापडत आहेत. कालच खासदार सुप्रिया सुळे औरंगाबाद येथे एका कुटुंबाकडे चहा घेण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी तिथे लाईट गेली. याच संधीचा फायदा घेत सुप्रियाताईंनी व त्या कुटुंबीयांनी अंधारात एक व्हिडीओ बनवला. 'सगळी जनता अंधारात असताना सरकार मात्र निवांत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अघोषीत भारनियमनाची दखल घेत काहीतरी उपाय करावा' अशी विनंती सुप्रियाताईंसह औरंगाबादकरांनी केली आहे.

हा व्हिडीओ सध्या जोरात व्हायरल होताना दिसत आहे. बर्याच दिवसांपासून संपूर्ण राज्यात भारनियमन सुरू आहे. कोळसा कमी असल्याने वीजनिर्मिती कमी होत आहे असे कारण देण्यात आले होते. ग्रामीण भागात तर आधीपासूनच वीजपुरवठा कमी असायचा. आता शहरांतही तीच अवस्था झाल्याने "खरंच आमचे अच्छे दिन आले" अशी टीका या व्हिडीओत सुप्रियाताईंनी केली. त्यामुळे प्रश्न विचारणारे आणखी जोमाने सरकारला जाब विचारीत आहेत.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget