DNA Live24 2015

म्हणून फिरवला सोयाबीनवर नांगर..!

निफाड (नाशिक) :
दुष्काळाने आणि सरकारी धोरणाने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. त्यामुळेच शेतकरी आंदोलनांचा भडका उडत आहे. त्यात काहीजण सहभागी होत आहेत. तर, काही अभागे आपल्याच उभ्या पिकावर नांगर फिरवून 'मनःशांती'चे प्रयोग करीत आहेत.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिवडी गावातही असाच प्रकार करून शेतकरी आपला व्यवस्थेवरील राग व्यक्त करीत आहेत. दाेन एकर साेयाबीनसाठी २६ हजार रुपये खर्च करूनही पावसाअभावी उत्पन्न निघण्याची अपेक्षा नसल्याने शिवडी येथील शेतकऱ्याने दोन एकर साेयाबीनच्या पिकावर रोटाेव्हेटर फिरविला आहे.

आप्पासाहेब दगुजी कातकाडे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी केली होती. त्यासाठी मजुरी, औषधे, रासायनिक खते असा जवळपास पंचवीस हजारावर खर्च केला. त्यानंतर चातकाप्रमाणे पावसाची वाट बघितली. मात्र, समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे सोयाबीनला अत्यल्प शेंगा आल्या. पाण्याअभावी सोयाबीन कोमेजून गेली. काही दिवसांपासून पावसाचा शिडकावाही झाला नाही. अखेरीस कातकाडे यांनी आपल्या दोन एकर सोयाबीन पिकावर रोटाेव्हेटर फिरविला.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget