DNA Live24 2015

अहमदनगर : नवरात्री काळात वाहतूक मार्गात बदल

अहमदनगर :
दिनांक 11 ते 18 ऑक्‍टोबर 2018  या कालावधीत  नवरात्री उत्‍सव साजरा होणार असून त्‍या काळात अहमदनगर शहराचे  आजुबाजुचे नागरिक मोठया प्रमाणावर अहमदनगर शहरामध्‍ये ये-जा करीत असतात.  तसेच सध्‍या  विळद- वाळूंज या बाहयवळण रस्‍त्‍याची  विशेष दुरुस्‍ती  सुरु असल्‍यामुळे या रोडवरील  सर्व प्रकारची अवजड वाहतुक अहमदनगर  शहरातून  वळविलेली आहे.  

अशा वेळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी  किंवा अपघात होवून कायदा व सुव्‍यवस्‍थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये या करिता अवजड वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.  त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा  यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33(1) (ब) नुसार प्राप्‍त अधिकाराचा वापर करुन वाहतुक वळविण्‍याबाबतचे नियमन आदेश जारी करण्यात आले आहे.

विळद घाट पायथाकडून अहमदनगर शहराकडू वळविण्‍यात आलेली सर्व प्रकारची जड-अवजड वाहने निंबळक – केडगाव बायपासमार्गे इच्छित स्‍थळी जातील. औरंगाबादकडून येणारी सर्व प्रकारची अवजड वाहने शेंडी बायपास- विळद घाट पायथा – निंबळक- केडगाव बायपास मार्गे  इच्छित स्‍थळी जातील.  अहमदनगर एमआयडीसी  या ठिकाणी येणारे सर्व प्रकारचे अवजड वाहनांना देखील प्रवेशबंद करण्‍यात आलेला आहे. सदरचा आदेश दिनांक 10 ऑक्‍टोबर रोजीचे सकाळी 6 वाजेपासून ते दिनांक 18 ऑक्‍टोबर 2018 रोजीचे 24  वाजेपर्यत आदेश जारी राहील असे  पोलीस अधिक्षक  अहमदनगर यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget