DNA Live24 2015

शहर कचरामुक्त करण्याचा विद्यार्थ्यांनी केला संकल्प

अहमदनगर :
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी व सार्वजनिक परिसराच्या स्वच्छतेसाठी पी.ए.इनामदार शाळेच्या विद्यार्थ्यांनी मुकुंदनगर परिसरात बॅण्ड पथकाच्या निनादात स्वच्छता जनजागृती रॅली काढली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात स्वच्छतेचे संदेश देणारे फलक घेऊन, घोषणा देत स्वच्छतेचे आवाहन केले.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त या स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य हारुन खान, उपप्राचार्य फरहाना शेख, मुसिरा आलम, संतोष जाधव आदि उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली व शहर कचरामुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला.

स्वच्छतेचा संदेश देणारी व अस्वच्छतेने पसरणार्‍या साथीच्या आजारांबाबत जागृती करणारी नाटिका विद्यार्थ्यांनी सादर केली. तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. शाळेत दररोज सफाई करणार्‍या कर्मचार्‍यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या वेशभुषेत कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

हारुन खान म्हणाले की, स्वच्छता हे निरोगी जीवनाचे अविभाज्य घटक आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी कृतीशीलतेने स्वच्छता मोहिम राबविली गेली पाहिजे. परिसरात स्वच्छता असल्यास वातावरण प्रसन्न राहते. सर्व धर्मात स्वच्छतेला महत्त्व दिले आहे. सर्व भारतीयांनी निश्‍चय केल्यास हा बदल घडणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. फरहाना शेख म्हणाल्या की, घराप्रमाणे परिसर देखील स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. अस्वच्छता असलेल्या परिसरातील नागरिकांना साथीच्या आजारांना सामना करावा लागत आहे. स्वच्छता ठेवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुमय्या शेख व मुन्नजा शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. 

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget