DNA Live24 2015

स्वच्छता कर्मचार्‍यांना आरोग्यरक्षक किटचे वाटप

अहमदनगर :
भारतीय देशभक्त पार्टी व रयत प्रतिष्ठान सामाजिक संस्थाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूरशास्त्री जयंती निमित्त प्रभाग क्रमांक 14 मधील स्वच्छता कर्मचार्‍यांना आरोग्यरक्षक किटचे वाटप करण्यात आले.

वाडियापार्क क्रीडा संकुल येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन, वर्षभर स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी तोंडावरील मास्क, जंतूनाशक साबुण आदींचा समावेश असलेल्या आरोग्यरक्षक किटचे वाटप अ‍ॅड.महेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय देशभक्त पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड.शिवाजीराव डमाळे, पोपटराव बनकर, मेजर रावसाहेब काळे, रजनी ताठे, नयना बनकर, वसंत डंबाळे, संजय आंधळे, साईनाथ बोराटे, भाऊसाहेब कासार, भगवान कराळे, योगेश खेडके, युवराज ढवळे, दर्शन बनकर, स्वाती बनकर, राजेंद्र शिंदे आदिंसह स्वयंसेवी संघटनेचे सदस्य व माजी सैनिक उपस्थित होते.
अ‍ॅड.शिवाजीराव डमाळे म्हणाले की, सध्याच्या प्रदूषणयुक्त वातावरणात सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वर्षभर स्वच्छता करुन काळजी घेणार्‍या महापालिकेचे स्वच्छता कर्मचार्‍यांसाठी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अ‍ॅड.महेश शिंदे यांनी थोर महापुरुषांची जयंती कृतिशीलपणे सामाजिक उपक्रमाने साजरी झाली पाहिजे. एका दिवसा पुरते स्वच्छता करुन प्रश्‍न सुटणार नसून, यासाठी व्यापक चळवळीची गरज आहे. वर्षभर स्वच्छता करणार्‍या कर्मचार्‍यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सदर उपक्रमाने भारावलो असून, केलेल्या कार्याची दखल घेतली जात असल्याची भावना मनपा कर्मचार्‍यांनी व्यक्त केली.  

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget