DNA Live24 2015

मोदींसह गुजराती व मराठी लोकांनाही विरोध

दिल्ली :
भूमिपुत्र या संकल्पनेची रुजुवात मुंबईनंतर अवघा महाराष्ट्र आणि आता गुजरात राज्यातही झाली आहे. गुजराती लोकांनी उत्तरप्रदेश आणि बिहारी नागरिकांना 'गुजरात छोडो'चा आदेश दिला आहे. याचेच पडसाद मुंबईत उमटत आहेत. त्याचवेळी वाराणसी (काशी) आणि उत्तर भारतात आता नरेंद्र मोदी यांच्यासह गुजराती व मराठी लोकांनाही उत्तर भारत सोडण्याबद्दलचे पोस्टर लागण्यास सुरुवात झाली आहे.

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापले आहे. उत्तर भारतात याचे पडसाद दिसत आहेत. वाराणसीचे खासदार आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातही पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘गुजराती नरेंद्र मोदी बनारस छोडो’ असे या पोस्टर्सवर लिहिलेले असल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेश-बिहार एकता मंचने इशारा म्हणून वाराणसीमध्ये हे पोस्टर्स लावले आहेत. या पोस्टर्समध्ये गुजरात, महाराष्ट्रात उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसेचा विरोध करण्यात आला आहे.

गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात १४ महिन्याच्या मुलीवर बलात्काराची घटना घडल्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमधील लोकांना गुजरात सोडण्यास भाग पडले जात आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget