DNA Live24 2015

राष्ट्रनिर्माणासाठी युवकांची भुमिका महत्त्वाची : डॉ.सुरेश पठारे

अहमदनगर :
राष्ट्रनिर्माणासाठी युवकांची भुमिका महत्त्वाची आहे. ज्या देशात क्रांती घडून विकास झाला तेथे युवकांनी बदल घडविल्याचा इतिहास आहे. युवकांचा देश असलेल्या भारतात देखील युवकच बदल घडवू शकणार असल्याचा विश्‍वास सीएसआरडी महाविद्यालयाचे संचालक डॉ.सुरेश पठारे यांनी व्यक्त केला.

 एक भारत श्रेष्ठ भारत उपक्रमांतर्गत नेहरु युवा केंद्राच्या वतीने राष्ट्राच्या विकासाकरीता माझे योगदान या विषयावर घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ.पठारे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक बाबाजी गोडसे उपस्थित होते. सीएसआरडी महाविद्यालयात झालेल्या या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून ही स्पर्धा घेण्यात आली होती. 

बाबाजी गोडसे म्हणाले की, प्रत्येक युवकांच्या मनात देशाप्रती प्रेम व आदर निर्माण होण्याची गरज आहे. ही भावना मनात रुजल्यास युवक देशाच्या विकासात्मक कार्यात योगदान देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी युवक-युवतींना पर्यावरण संतुलन, स्वच्छता, युवा मतदार जागृती, पर्यटनपर्व, पोषण आहार, गोवर व रुबेला लसीकरणबद्दल जनजागृती करण्यात आली. तसेच स्वच्छता हीच सेवा या उपक्रमात सक्रीय सहभाग घेणार्‍या युवकांचा यावेळी गौरव करण्यात आला. या वकृत्व स्पर्धेत प्रथम- शुभांगी माने, द्वितीय- दिलीप खंदारे, तृतीय- कोमल सोनवणे यांनी बक्षिसे पटकाविले. या विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे 5 हजार, 2 हजार व 1 हजार रुपये, प्रमाणपत्र बक्षिस देण्यात आले. प्रथम विजेत्यास राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला पाठविण्यात येणार आहे. स्पर्धेचे परिक्षक म्हणून महाविद्यालयाचे एनएसएस समन्वयक सुरेश मुगुटमल, डॉ.अमोल बागुल, प्रा.आसावरी झोपले यांनी काम पाहिले. यावेळी गोरक्षनाथ पवार, राहुल पाटोळे, डॉ.जयमोन वर्गीस, योगेश कुदळे, विजय संसारे आदिंसह सीएसआरडीचे प्राध्यापक व महाविद्यालयीन युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नाली राजे भोसले व श्रुती मुंगिकर यांनी केले. आभार आकाश बोर्डे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नेहरू युवा केंद्राचे सर्व स्वयंसेवक व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget