DNA Live24 2015

शिक्षण आयुक्त कार्यालयाला दारुची बाटली देऊन निषेध...

पुणे :
सर्व शिक्षा अभियानासाठी वाटप करण्यात आलेल्या ‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या पुस्तकात संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त आणि खोटे उल्लेख केल्याचे स्पष्ट झाले आहे. याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात दारुची बाटली भेट दिली.

‘समर्थ श्री रामदास स्वामी’ या डॉ. शुभा साठे यांनी लिहिलेल्या पुस्तकात संभाजी राजांविषयी दिशाभूल करणारा, खोटा आणि वादग्रस्त उल्लेख करण्यात आला आहे. लेखिकेने त्यात म्हटले आहे की, ‘रायगडावरुन संभाजीराजांनी केलेल्या अनेक खऱ्या- खोट्या अत्याचारांच्या बातम्या समर्थांच्या कानावर येत होत्या. संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला होता. स्वराज्याची ही अवहेलना पाहून समर्थांचे अंत:करण तिळतिळ तुटत होते. मनातला राम अखेरच्या कर्तव्याची टोचणी लावत होता. अखेर समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिले.’
या पुस्तकातील या वाक्यांमुळे संभाजी ब्रिगेड आणि इतरही संघटना आक्रमक झाल्या आहेत. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन आयुक्त रजेवर असल्याने त्यांच्या पीएला दारुची बॉटल देत या घटनेचा निषेध केला. संबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्याची मागणीही याप्रसंगी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Post a Comment

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Star Pro. Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget